Amol Khatal : एकनाथरावांचा शिलेदार एकाच 'बाणा'त मंत्री विखेंसह अनेक 'पक्षी' टिपण्याच्या तयारीत...

Amol Khatal Prepares to Counter BJP, NCP, MVA in Ahilyanagar Local Elections Shiv Sena News : अहिल्यानगर संगमनेरमधील डीसीएम एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखेंसह भाजप, एनसीपी आणि मविआ घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
Amol Khatal
Amol KhatalSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar local elections : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संगमनेरमधील शिलेदार आमदार अमोल खताळ यांना पहिल्याच प्रयत्नात सत्तेचं फळ चाखायला मिळालं. काँग्रेसचे बाहुबली नेते, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची आमदारकी खेचून घेतल्यानंतर कितीही नाही म्हटलं, तरी सत्तेत 'काॅन्फिडंट' वाढला आहे.

सत्तेत टिकायचं असेल, तर राजकीय संघटन बाळगलं पाहिजे, हे संघटनेतून आमदार झालेल्या अमोल खताळ यांच्या नजरेतून हुकलं नसेल, तर नवल! स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीच्या तयारीत असलेल्या आमदार खताळ यांनी आपलाच कार्यकर्ता तिथं असावा, यासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यात जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसतात. एकप्रकारे असं म्हणता येईल की, एकनाथ शिंदेंचा हा शिलेदार एकाच 'बाणा'त मंत्री विखेंसह भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी आणि मविकास आघाडीला टिपण्याच्या तयारी करत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षाअखेरीज होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये महायुती (Mahayuti) किंवा महाविकास आघाडी होईल की नाही, याची शाश्वती नाही. मंत्री, आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आपापल्या पातळीवर संघटन बांधणी करत आहे. यात सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे. या तिन्ही पक्षातील मंत्री, आमदार, स्थानिक नेते पक्ष संघटनेच्या माध्यमातून आपला आगामी बालेकिल्ला मजबूत करण्यात गुंतले आहेत. नवखे आमदार देखील यात मागे नाहीत. त्यात संगमनेरचे तालुक्यातील शिवसेनेचे आमदार अमोल खताळ सध्या चर्चेत आहेत.

Amol Khatal
Balasaheb Thorat Gujarat charge : थोरातांची पराभवाच्या परतफेडीसाठी, मोदी अन् शाह यांच्या गुजरातवर 'स्वारी'; काँग्रेसचं देखील बळ मिळणार

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या अकोले तालुक्यातील माजी उपसभापती मारुती मेंगाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तीन दिवसांपूर्वी प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेशासाठी अकोले ते मुंबई, असे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. अकोले तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींचे माजी सरपंच, सदस्य, नगरपंचायतीचे माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांचा हा प्रवेश झाला. मारुती मेंगाळ विधानसभा निवडणुकीत सक्रिय होते, त्यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली होती.

Amol Khatal
Nilesh Lanke vs Radhakrishna Vikhe : 'भाजप मंत्र्यांनं शेतकऱ्यांचा पैसा खाल्ला'; पवारसाहेबांचा शिलेदार म्हणतो, 'आता हे मंत्रिमंडळात नाहीच पाहिजे'

भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या अकोले बालेकिल्ल्यात झालेली ही राजकीय उलथापालथ घडवून आणण्यात आमदार अमोल खताळ यांनी प्रमुख भूमिका बजावली. तसं पाहिल्यास अकोले तालुका कम्युनिस्ट आणि डाव्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या तालुक्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची देखील मजबूत पकड आहे. तिथंच आमदार खताळ यांनी मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणल्यानं, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजप, अजितदादांच्या राष्ट्रवादीसह मविआला देखील झुंजाव लागणार आहे, असे दिसते.

अकोल्यामधील राजकीय उलथापालथीनंतर आमदार खताळ यांच्यान निवासस्थानी संगमनेर तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द रायतेवाडी, निमगाव पागा, झोळे गावांतील ठाकरे शिवसेनेतील जवळपास पन्नास ते साठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी हा प्रवेश केला.

आमदार खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि वारसा पुढे नेत आहेत. जुने व नवे कार्यकर्ते, असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांनाच न्याय मिळावा, हीच आपली भूमिका आहे. कोणालाही दुखावले जाणार नाही. येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा फडकवण्याचा आपला निर्धार आहे. सर्वसामान्य कार्यकत्यांसह नागरिकांचे विविध प्रश्न एका ठिकाणी सोडवता यावे म्हणून कार्यालय उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून, यावेळी स्थानिक पातळीवर दिग्गज नेते, पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत आमदार खताळ यांनी दिले. या प्रवेशातून संगमनेरमध्ये शिवसेनेला नवं बळ मिळणार असून, नव्या राजकीय समीकरणांची उभारणी होईल. याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला करून घेण्याची रणनीती आमदार खताळ यांची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com