Balasaheb Thorat Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Congress : मंत्र्यांना त्यांच्या अधिकारांची आठवणच नाही; बाळासाहेब थोरातांनी महायुती सरकारला डिवचलं

Congress Balasaheb Thorat Slams Mahayuti Ministers Over Fund Diversion to Ladki Bahin Yojana : माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विविध खात्यांचा निधी वळवला जात असून, त्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी महायुती सरकारला फटकारलं आहे.

Pradeep Pendhare

Mahayuti government criticism : माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विविध खात्यांचा निधी वळवला जात आहे. तशा बातम्या देखील समोर आहे. यामुळे महायुती सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

महायुती सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेते, असे काही झालं नाही, हे घशा फोडून सांगत आहेत. यातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टायमिंग साधत महायुतीमधील मंत्र्यांना डिवचलं आहे. त्यांना त्यांच्या अधिकारांची आठवण करून दिली आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विविध खात्यांचा वळवण्यात येणाऱ्या निधीवरून महायुती सरकारला फटकारलं. ते म्हणाले, "राज्यात प्रत्येक विभागाला मिळणारा निधी हा त्यांचा हक्काचा असतो. असे असताना महायुती सरकारमधील मंत्री आपले अधिकार विसरले आहेत. जो त्या खात्याचा मंत्री, तोच त्या खात्याचा अर्थमंत्री असतो. असं असताना तो निधी अन्यत्र वळवला जातोय हे दुर्दैवी आहे". गरीब घटकांवर अन्याय करणारे निर्णय महायुती सरकार घेत आहे, असे आरोप देखील बाळासाहेब थोरात यांनी केला.

शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर थोरात म्हणाले, "ते एकत्र येतील का नाही हे अजून निश्चित नाही. केवळ मीडियात या चर्चा आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे आणि राहील". आगामी निवडणुकात एकत्रितपणे आम्ही सामोरे जाऊ, असा विश्वास देखील थोरातांनी व्यक्त केला.

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत राहुल गांधी जे बोलले ते लोकांमधील चर्चा आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना हे सरकार उत्तर का देत नाही? उलट राहुल गांधी पाकिस्तान धार्जिणे, आहेत असा अपप्रचार केला केला जात आहे. हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. लोकांमधील संभ्रम सरकारने दूर केला पाहिजे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

CBSC अभ्यासक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांचा 68 शब्दांचा इतिहास सांगितला आहे. त्यावर बोलताना, 'हा मुद्दा गंभीर असून, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या वयातच चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. छत्रपतींचा इतिहास खूप देदीप्यमान आहे. कोणत्याही मीडियमला असला, तरी तो पूर्ण आलाच पाहिजे. सरकारने अभ्यासक्रम तपासावा आणि तो दुरुस्त करावा', अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT