Congress Ahilyanagar Violence: काँग्रेसचे अहिल्यानगरमधील जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून नेत, त्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकाराने खळबळ उडाली आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
जिल्हाध्यक्ष सचिन गुजर गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका कोणी केला? कशातून गेला? याची चर्चा श्रीरामपूरमध्ये सुरू असून, ऐन नगरपालिका निवडणुकीत हा प्रकार झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस श्रीरामपूरमध्ये आंदोलन सुरू केलं आहे.
श्रीरामपूर (Shrirampur) नगरपालिकेची निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर इथं गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. यातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा मुद्दा निवडणुकीत गाजत आहे. यातच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे आज सकाळी अपहरण करून नेत मारहाण झाल्याची घटनेनं खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष सचिन गुजर हे सकाळी माॅर्निंग वाॅकला बाहेर पडले होते. माॅर्निंग वाॅक उरकून सचिन गुजर घराजवळ आले होते. त्याचवेळी त्यांच्या मागून कार आली. त्यांच्या बाजूला कार थांबवून त्यातून दोन युवक उतरले अन् सचिन गुजर यांच्यासमोर गेले.
त्यांच्याशी दोघा युवकांनी हुज्जत घातली अन्, त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवले. सचिन गुजर यांना तेथून पुढे गोखलेवाडी इथं नेले. सकाळ वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती, याचा फायदा अपहरणकर्त्यांनी घेतला.
कारमध्ये आणखी दोघे जण होते. अपहरणकर्त्यांनी सचिन गुजर यांना गोखलेवाडी इथं नेत, जबर मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आलं. जखमी सचिन गुजर यांना पुढं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण झाल्याच्या वृत्तानं श्रीरामपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
काँग्रेसचे पदाधिकारी या घटनेवरून चांगलेच आक्रमक झाले आणि श्रीरामपूर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं. आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण ससाणे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. अपहरणकर्ते हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी काँग्रेस आंदोलकांनी केली.
दरम्यान, श्रीरामपूर पोलिस या घटनेनंतर तत्काळ अॅक्शन मोडवर येत, गुन्ह्यातील काही संशयितांची धरपकड सुरू केली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सहा जण असल्याचे निष्पन्न केले आहेत. त्यातील तिघांसह अपहरणात वापरलेली कार ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकीवर दोघे अपहरणकर्ते होते.
ते सचिन गुजर यांचा माग काढत होते. श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत थेट काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण झाल्याने निवडणूक खूपच संवेदनशील बनल्याचे चित्र आहे. या घटनेमागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.