Sujay Vikhe Patil new decision in Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचा कारभार हाती घेताच, अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील यांनी धडाकेबाज निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्य सहकारी बँकेच्या धर्तीवर सहकारी साखर कारखान्यांचे 'ग्रेडेशन' करून कर्ज धोरण ठरवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या संमतीने ठरवा जाईल, असे संचालक मंडळाच्या पहिल्या सभेच्या बैठकीनंतर सांगितले. या पहिल्याच सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके, भाजप आमदार प्राजक्त तनपुरे अनुपस्थित होते.
सहकारी साखर कारखान्यांचे 'ग्रेडेशन'चा मुद्दा स्पष्ट करताना, सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, "कर्जाची परतफेड न केल्यामुळे दोन सहकारी साखर कारखाने बँकेने जप्त केले आहेत. कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजावरच बँक शेतकऱ्यांना सलवती देऊ शकते. यातून कारखान्याची आर्थिक परिस्थिती आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन, कारखान्यांचे 'ग्रेडेशन' केले जाणार आहे."
जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. त्यानुसार बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायक निर्णय घ्यावे लागतील. बँकेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास केला जात असून, त्यातून काही चांगले, तर काही कटू निर्णय घ्यावे लागतील. बँकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. साखर कारखान्याचा आगामी हंगाम अशक्य दिसत आहे. त्यामुळे कारखाने चालवा किंवा संघर्ष करा, अशी परिस्थिती राहील, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
ऊसाच्या भावावर बोलताना, विखे पाटील यांनी, राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांना चार हजार ते 4200 रुपयांची उचल दिली आहे. अहिल्यानगर जिल्हा बँकेला 3800 ते चार हजार रुपये देण्याचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. सहकारी कारखान्यांनी जो भाव परवडेल तो त्यांनी द्यावा. साखरेच्या स्थिर भावावर बरच गणित अवलंबून राहणार आहे. उतारा 11 राहिल्यास तर 3400 पहिली उचल देणे कारखान्यांना शक्य होणार आहे, असे सांगितले.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेकडून दुष्काग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्हा बँकेकडून एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतनाचा देखील समावेश केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन, त्यांच्याकडे हा निधी दिला जाईल. याशिवाय 'अहिल्यानगर जिल्हा बँक', असे नामांतराची प्रक्रिया दोन परवानग्या अभावी रखडली आहे. ती पुढील काही दिवसांत पूर्ण होऊन कार्यवाही होईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.