Ram Shinde Nilesh Lanke Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : मंत्री विखे-थोरात सहमती एक्सप्रेसला राम शिंदे अन् नीलेश लंके स्वतंत्र भिडणार

Ahilyanagar DCC Bank Election 2026: Nine seats unopposed, while Ram Shinde and Nilesh Lanke challenge Radhakrishna Vikhe-Balasaheb Thorat panel remaining 12 seats : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 21 पैकी 9 जागा बिनविरोध; उर्वरित 12 जागांसाठी निवडणूक. राम शिंदेंनी चार, तर नीलेश लंके यांनी आठ उमेदवारांचे नेतृत्व करणार असल्याचे चित्र स्पष्ट.

Pradeep Pendhare

Ahilyanagar cooperative bank politics : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मंत्री विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेस विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके स्वतंत्र जागांवर लढत देणार आहे.

जिल्हा बँकेच्या 12 जागांवर निवडणूक होणार असून, राम शिंदे यांनी चार, खासदार लंके यांनी आठ जागांवर उमेदवार दिले आहेत.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या (DCC Bank) 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी आज बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी शर्यतीने प्रयत्न केला. याच दरम्यान, सभापती प्रा. राम शिंदे यांनी चार उमेदवारांची घोषणा केली. त्याखालोखाल खासदार नीलेश लंके यांचा देखील संयम सुटला अन् थेट आठ उमेदवार जाहीर केले.

राम शिंदे (Ram Shinde) यांनी दुपारी एक वाजता अचानक चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले. त्यात कर्जतमधून ज्योती प्रकाश शिंदे, जामखेडमधून सचिन घुमरे, महिला राखीवच्या एका जागेसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड व मागासवर्गीय मतदारांघासाठी आजिनाथ हजारे यांची नावे जाहीर केली. याचबरोबर निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. या चार जागांवर सभापती प्रा. शिंदेविरुद्ध मंत्री विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेस, अशी लढत होणार आहे.

चिन्ह वाटपानंतर राम शिंदे भूमिका जाहीर करणार

अकोले, श्रीगोंदा, पारनेर, नगर, श्रीगोंदा सोसायटीच्या चार जागांसह महिला राखीवची एक जागा, अनुसूचित जाती-जमातीची एक, इतर मागसवर्गीयची एक, विमुक्त जाती भटक्या जमातीची एक या राखीवच्या चार, अशा आठ जागांवर खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली मंडळ व मंत्री विखे पाटील- थोरात सहमती एक्सप्रेस, अशी लढत होणार आहे. तसेच महिला राखीव एक जागा व मागसवर्गीय एक, अशा दोन जागांसाठी मात्र विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेससमोर खासदार लंके शक्य झाल्यास सभापती प्रा. शिंदे, असे तीन मंडळ एकमेकांच्या समोर उभे असू शकतात. उमेदवार देण्यामागे चिन्ह वाटपानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केले. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरू असलेल्या अटापिट्यानंतर, 21 पैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या.

सुजय विखेंसह नऊ जागा बिनविरोध

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी तालुका सोसायटी मतदारसंघातून भाजप आमदार मोनिका राजळे (पाथर्डी), भाजप आमदार अक्षय कर्डिले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (राहाता), जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले (शेवगाव), संजीवनी उद्योग समृहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे (कोपरगाव), काँग्रेसचे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे (श्रीरामपूर) यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज माघारीने या नेत्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख (नेवासा), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख (संगमनेर), तर बिगर शेती मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप या नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सोसायटी मतदारसंघातील सात, तर राखीव मतदारसंघात दोन, अशा नऊ जागा बिनविरोध करण्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजीमंत्री बाळासाहेब थोरात या सहमती एक्सप्रेसला यांना यश आले आहे.

तीन लंगडे पॅनल एकमेकांना भिडणार

उर्वरित 12 जागांसाठी आता निवडणूक होत आहे. यात सोसायटी मतदारसंघातील अकोले, श्रीगोंदा, पारनेर, नगर, राहुरी, कर्जत व जामखेड या सात जागांसह महिला राखीवच्या दोन, अनुसूचित जाती-जमातीची एक, इतर मागसवर्गीयची एक, विमुक्त जाती भटक्या जमातीची एक या राखीवच्या पाच, अशा 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आता तीन लंगडे मंडळ उभे असल्याचे प्राथमिक चित्र आहे. यात मंत्री विखे पाटील-थोरात यांचे सहमती एक्सप्रेस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र मंडळ या बँकेच्या निवडणूक रिंगणात दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT