Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार? पाच जागांवर पेच

Ahilyanagar District Bank election faces uncertainty five constituencies remain unresolved amid efforts political leaders secure unopposed outcome : सर्वपक्षीय नेत्यांच्या एकीच्या प्रयत्नांनंतरही पारनेर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत आणि श्रीरामपूरमध्ये तिढा कायम; आज दुपारी तीननंतर चित्र स्पष्ट होणार.
Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar District Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक होणार की, बिनविरोध होणार, याचा आज फैसला होईल. पण बिनविरोधसाठी पाच जागांवर मोठा पेच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंकेंचे होमटाऊन असलेले पारेनर, अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांचे अकोले, भाजप आमदार विक्रम पाचपुते श्रीगोंदा, सभापती प्रा. राम शिंदे यांचे कर्जत, काँग्रेस आमदार हेमंत ओलगे यांचे श्रीरामपूर यांच्या मतदारसंघात पेच आहे.

नेवासा, संगमनेर हे मतदारसंघ बिनविरोध झाले आहे, तर शेवगाव आणि कोपरगाव सोसायटी मतदारसंघात राजकीय कुटुंबातून कोण, पुढे जाणार याचा फैसला आज होईल. पारेनर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत, श्रीरामपूर (Shrirampur) या ठिकाणी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. यासह जनरलच्या काही जागांवर रस्सीखेच सुरू आहे. या पाच जागांमुळे जिल्हा बँकेच्या बिनविरोधला मोठा अडथळा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, नेत्यांच्या एकीनंतर देखील काही ठिकाणी कार्यकर्ते व इच्छुकांमध्ये बेकी असल्याचे दिसून आले.

अहिल्यानगर शहरात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मंगळवारी रात्री जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी वेगवान घडामोडी घडल्याची माहिती आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी चर्चांचे गुऱ्हाळ रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याची फलनिष्पत्ती आज दुपारी तीन वाजल्यानंतर समोर येईल. सर्वपक्षीय बैठकीत एकीच्या चर्चेनंतर देखील जिल्हा बँक बिनविरोध होईल, हे सांगतांना नेत्यांच्या आवाजात जोर नव्हता. यामुळे जिल्हा बँक निवडणुकीसाठी काही जागांसाठी लढत अटळ असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar DCC Bank : विखे-थोरात एकत्र, पण बिनविरोधचा पेच कायम! अहिल्यानगर जिल्हा बँकेचा आज फैसला, काय घडणार?

खासदार लंकेंची पारनेरमधून जोरदार तयारी

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. बँकेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व नेते एकत्र आले. जिल्हा बँकेत आपण नसलो तरी चालेल. पण बँकेची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, अशी सावध प्रतिक्रिया खासदार नीलेश लंके यांनी बैठकीनंतर दिली. मात्र, दुसरीकडे खासदार लंके बँकेच्या निवडणुकीसाठी पारनेर सोसायटी मतदारसंघातून जोरदार तयारी करत असल्याने या मतदारसंघात निवडणूक रंगण्याची शक्यता आहे.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी थोरात-लंके एकत्र येईनात? राम शिंदेंच्या हालचालींनी वाढवली उत्सुकता

बैठकीसाठी नेत्यांची दिमाखदार एंट्री

जिल्हा बँक बिनविरोधासाठी झालेल्या बैठकीत अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे सुरवातीला आगमन झाले. त्यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे व माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले एकाच गाडीतून आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात त्यानंतर आले. शासकीय विश्रामगृहातील एका कक्षात माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार किरण लहामटे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी संचालक भानुदास मुरकुटे, करण ससाणे, राजेंद्र नागवडे यांच्यात चर्चा रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com