Sujay Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank : शिंदे-विखेंमध्ये 'सहकारा'त तीव्र स्पर्धा? जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा चेंडू सुजय विखेंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे टोलवला

Sujay Vikhe Patil puts the Ahilyanagar district bank decision in CM Devendra Fadnavis' hands : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावरून भाजपमध्ये सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेत अध्यक्ष पदावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठे विधान केले आहे. 

Pradeep Pendhare

Ahilyanagar district bank presidency : अहिल्यानगरमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठे विधान केले आहे. डॉ. विखे पाटील यांनी हे विधान करताना साधलेल्या टायमिंगची आता जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षातले प्रतिस्पर्धी भाजपचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे व्यासपीठावर उपस्थित असतानाच हे विधान केल्याने शिंदे-विखे पाटील यांच्यातील स्पर्धा आणखीनच अधोरेखित झाली आहे.

भाजपच्या अहिल्यानगर पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी बैठकीत दोघे एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना डॉ. विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात  टोलावाला.

डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी, अहिल्यानगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील, हे सांगताना तेच आमचे 'बॉस' आहेत हे स्पष्ट केले. ते सांगतील तेच होईल बाकी इतर विचार करण्याचे आणि कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही, असेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) बाबतीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी या बैठकीच्या निमित्ताने अहिल्यानगरमध्ये बेधडक विधान केले. प्रतिस्पर्ध्यांना एक प्रकारे कानपिचक्याच दिल्या. जिल्हा बँक हा भाजप अंतर्गत किंवा भाजप-काँग्रेस, असा विषय नाही. माझ्या नावावर सहमती होत नसेल किंवा माझ्या नावाबद्दल वाद असेल, तर त्यांनी तसे जाहीर करावे, अशा शब्दात आपली भूमिका डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केली. 

बँकेच्या पदावर बसण्यास मी इच्छुक नाही, हे स्पष्ट करताना जिल्हा बँक ही एकमेव, अशी बँक आहे, जी शेतकऱ्यांना कर्ज देते. अन्यथा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारात देखील उभ्या करत नाहीत. शेतकऱ्यांना जिल्हा बँकच न्याय देऊ शकते. राहाता किंवा कर्जत-जामखेडला काय वाटते, याला काही अर्थ नाही. काँग्रेसला काय वाटते याला देखील अर्थ नाही, असाही टोला डॉ. विखे पाटील यांनी लगावला. 

विधानसभा लागली, विधान परिषद झाली तरी, सुजय विखे पाटील यांचेच नाव पुढे केले जायचे. परंतु आमचे 'बॉस' हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे 'बॉस' जो निर्णय घेईल, तोच अंतिम राहील, असे पुन्हा एकदा डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT