Ahilyanagar DCC Bank Election : महायुतीतच कुरघोड्या; अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीआधी संघर्षाची ठिणगी

Mahayuti's internal equations heat up ahead of the Ahilyanagar District Bank election : राहुल जगताप आणि भानुदास मुरकुटे यांच्या सहकारी संस्थांवरील कारवायांनंतर राजकीय चर्चांना उधाण; महायुतीतील अंतर्गत समीकरणांचा जिल्हा बँक निवडणुकीवर परिणाम होणार?
Rahul Jagtap Bhanudas Murkute
Rahul Jagtap Bhanudas MurkuteSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar District Cooperative Bank : अहिल्यानगर मधील जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय कुरघोड्यांना सुरूवात झाली आहे. महायुतीमधील अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेतील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या ताब्यातील सहकारी संस्थांवर झालेल्या प्रशासकीय कारवाईमुळे ठिणगी पडली आहे.

या दोन्ही नेत्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकीय कारवाई झाली असली, तरी त्याला राजकीय अँगल असल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे. याचे परिणामी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या मैदानात उमटताणा दिसतील, असे सांगितले जात आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी निश्चित करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. सहकारातील मातब्बरांनी शड्डू ठोकण्यास सुरूवात केली आहे. नवखे देखील आपापल्या नेत्यांजवळ फिल्डिंग लावून बसले आहेत. महायुती अन् मविआ असा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, महायुतीत अंतर्गत सर्वाधिक राजकीय संघर्ष असल्याचे दिसते आहे. महायुतीत सध्या आपल्या प्रतिस्पर्धीवर मात कशी करता येईल, याच्या कुरघोड्या सुरू आहेत. यातूनच शांत असलेली मविआ जुळवाजुळवीचे गणित जुळल्यास ते महायुतीला भारी भरेल, असा राजकीय अंदाज बांधला जात आहे.

अलीकडेच जिल्ह्यात दोन मोठ्या प्रशासकीय कारवाया झाल्या. या कारवाई महायुतीमधील (Mahayuti) नेत्यांना धक्का देणाऱ्या ठरल्या. यामुळे या कारवाया प्रशासकीय असल्या तरी त्याला राजकीय अँगल असल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे. महायुतीमध्ये नेत्यांची गर्दी झाली आहे. ही गर्दी साधीसुधी नसून, सहकारातील मातब्बरांची आहे. यांच्यात पूर्वीपासून संघर्ष राहिला आहे. तोच संघर्ष पुन्हा-पुन्हा उफाळून येतो.

Rahul Jagtap Bhanudas Murkute
Ahilyanagar District Bank Election : ‘तुम्ही कितीही अंत पाहा...’; नीलेश लंके यांचा विरोधकांना थेट इशारा, जिल्हा बँकेवरून अहिल्यानगरात संघर्षाची नांदी?

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांनी त्यांच्या कुकडी कारखान्यावर झालेल्या कारवाईवरून विरोधकांना लक्ष्य केले. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते हे जगताप यांचे विरोधक आहेत. जगताप यांचा रोख पाचपुते यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे, जगताप व पाचपुते हे दोघे महायुतीत आहेत. परंतु, कुकडी कारखान्याच्या कारवाईवरून त्यांच्यातील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. राजेंद्र नागवडे हेही अजित पवार राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे तेथे टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो आहे. जगतापांकडील हाच कारखाना जिल्ह्यातील भाजप नेता भागीदारीत चालवण्यासाठी पुढाकार घेतला होता. यातून काहीशा अंतर्गत राजकीय कुरघोड्या रंगल्या होत्या.

Rahul Jagtap Bhanudas Murkute
Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक: कोर्टाच्या दणक्यानंतर प्रताप ढाकणेंच्या कट्टर समर्थकाचा ठराव मंजूर

श्रीरामपुरात संघर्ष आणखी तीव्र...

एकनाथ शिंदे शिवसेनेत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अशोक सहकारी बँकेवर झाली. ही कारवाई आरबीआयने केली असली, तरी कारवाईच्या टायमिंगवरून, राजकीय चर्चा रंगली आहे. मुरकुटे हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूर्वीपासूनचे विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुरकुटेंना तुरुंगात जावे लागले होते. मुरकुटे हे जिल्हा बँकेचे संचालक देखील राहिले आहेत. यावेळीही ते तयारीत आहेत. त्यांच्या नावाने ठराव झाला आहे. बँकेच्या संचालकपदासाठी श्रीरामपुरात संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com