Maharashtra cooperative bank election : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले किरण शेटे पात्र असतानाही त्यांच्या नावाचा ठराव करण्यात आला नाही. याविरोधात किरण शेटे यांच्यासह चार संचालकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
यावर पुन्हा बैठक घेऊन ठराव पारित करण्याचा आदेश खंडपीठाने दिले आहेत. केळवंडी सेवा सोसायटीचे सचिव दादासाहेब कंठाळी यांना हा आदेश देण्यात आला आहे. न्यायालयाच्या दणक्यानंतर दोन दिवसांपूर्वीच किरण शेटे यांचा ठराव मंजूर झाला आहे.
किरण शेटे तालुक्याच्या राजकारणात प्रताप ढाकणे यांचे समर्थक, तर भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील सेवा सोसायट्यांचे ठराव मागविण्यात आले होते. तालुक्यातील 84 सेवा सोसायट्यांपैकी 83 सोसायट्यांचे ठराव मुदतीत सहायक निबंधक कार्यालयात दाखल झाले होते.
कंठाळी यांनी केळवंडी सेवा सोसायटीमध्ये ठराव करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत कोरम पूर्ण न झाल्याने ठराव प्राप्त झाला नाही, असे सहायक निबंधक कार्यालयाला कळविले होते. याविरोधात शेटे व चार संचालकांनी खंडपीठात (Court) धाव घेतली. सेवा सोसायटी मतदारसंघातून ठराव मागविण्यासाठी सहकार विभागाने एक महिन्याचा अवधी दिला होता.
मात्र, दादासाहेब कंठाळी यांनी मुदत संपण्याच्या एक दिवस आधी या विषयावर बैठक आयोजित केली. या बैठकीस नऊपैकी पाच संचालक उपस्थित असतानाही कंठाळी यांनी कोरम पूर्ण झाला नसल्याचे सहायक निबंधक कार्यालयाला कळविले.
आपण पात्र असूनही आपल्या नावाचा ठराव करण्यात आला नसल्याचे शेटे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यावर खंडपीठाने शेटे व इतर चार संचालकांच्या बाजूने निकाल देत लवकर बैठक घेऊन ठराव पारित करण्याचे आदेश दिला आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.