Ahilyanagar DCC Bank Election 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : 'तिसरा पर्याय' फेटाळला नाही! अहिल्यानगर जिल्हा बँकेत मुख्यमंत्री लक्ष घालणार का? राम शिंदेंनी सर्वकाही सांगितले

Ram Shinde keeps political suspense alive over Ahilyanagar DCC Bank election : राजकीय गाठीभेटींमागचं कारण प्रथमच स्पष्ट; 'सहकाराचा अभ्यास करतोय' म्हणत युती, महाविकास आघाडी आणि तिसऱ्या पर्यायाबाबत सस्पेन्स कायम

Pradeep Pendhare

Ahilyanagar DCC Bank : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गाठीभेटींवर प्रथमच भूमिका स्पष्ट केली.

सहकार क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी विविध नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे सांगतानाच त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 'तिसरा पर्याय' पुढे येण्याची शक्यता फेटाळली नाही. मात्र, युती, आघाडी किंवा तिसऱ्या पर्यायाबाबत सध्या भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, "माझ्या 25 वर्षांच्या राजकीय प्रवासात सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले नव्हते. मात्र, जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत यंदा या क्षेत्रात सक्रिय होणार असल्याचे सांगितले होते. ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सहकार क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या."

जिल्हा बँकेची (DCC Bank) निवडणूक होणार की बिनविरोध होणार, याबाबत विचारले असता त्यांनी, "अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे निवडणूक होईल की बिनविरोध होईल, यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळीच चित्र स्पष्ट होईल," असे सांगितले.

मुंबईत जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, "त्याबाबत फक्त चर्चा सुरू आहेत," एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत काय म्हणाले?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा बँक निवडणुकीत लक्ष घालत असल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना राम शिंदे म्हणाले, "राज्यात 36 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. प्रत्येक बँकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री थेट लक्ष घालतील, असे नाही. मात्र, परिस्थितीनुसार महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. सध्या तरी त्यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातल्याचे जाणवत नाही. भविष्यात आवश्यकता भासल्यास ते निश्चितच बारकाईने लक्ष देतील."

'तिसरा पर्याय' चर्चेत

जिल्हा बँक निवडणुकीत युती, महाविकास आघाडी की तिसरा पर्याय, यापैकी कोणते समीकरण पाहायला मिळेल, या प्रश्नावरही राम शिंदे यांनी सावध भूमिका घेतली. "निवडणूक जाहीर झाल्यानंतरच पुढील राजकीय चित्र स्पष्ट होईल. मी सहकार क्षेत्राचा अभ्यास करणारा नवोदित विद्यार्थी आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही," असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT