Ram Shinde DCC Bank : खेमनर ते तनपुरे..! प्रा. राम शिंदेंच्या भेटींमुळे जिल्हा बँक निवडणुकीचे राजकारण तापले

Ram Shinde meetings fuel speculation ahead of Ahmednagar DCC Bank polls : संगमनेरमध्ये बाजीराव खेमनर यांची सदिच्छा भेट, त्यानंतर प्रसाद आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत तासभर चर्चा; सहकार राजकारणात नव्या आघाड्यांच्या चर्चांना उधाण, मात्र अधिकृत दुजोरा नाही.
Ram Shinde DCC Bank
Ram Shinde DCC BankSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सलग राजकीय भेटींमुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चांना वेग आला आहे.

प्रा. राम शिंदे यांनी संगमनेर तालुक्यातील साकूर येथे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सहकार नेते बाजीराव खेमनर यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह तनपुरे कुटुंबीयांशीही चर्चा केली.

काँग्रेस (Congress) नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाजीराव खेमनर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर या भेटीचे विविध राजकीय अर्थ लावले जात आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार राजकारणात नवी समीकरणे आकाराला येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांबाबत कोणत्याही संबंधित नेत्यांकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

त्यानंतर प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट देत आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण तनपुरे यांच्यासह सुमारे तासभर चर्चा केली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, जिल्हा बँक निवडणूक आणि सहकार क्षेत्रातील बदलत्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Ram Shinde DCC Bank
Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीआधी भाजपमध्ये हालचाली; राम शिंदेंच्या गाठीभेटींवर विखेंचा टोला, 'सहकारातील निवडणुका बिनविरोधही होतात'

या सलग भेटींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय गटांमध्ये नव्या आघाड्या किंवा समन्वयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेच्या संदर्भातही विविध राजकीय तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, या सर्व चर्चांना संबंधित नेत्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Ram Shinde DCC Bank
Ram Shinde DCC Bank Panel : अहिल्यानगरात मोठा राजकीय ट्विस्ट! भाजपचे राम शिंदे काँग्रेस थोरात समर्थकांच्या भेटीला; जिल्हा बँकेसाठी नवी समीकरणे?

शिंदे-तनपुरे जवळीक

यापूर्वी राहुरी पोटनिवडणुकीच्या काळातही प्रा. राम शिंदे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात दीर्घ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्या बैठकीत आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे बोलले गेले होते. त्यामुळे सध्याच्या भेटींनाही त्याच पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.

विखे-तनपुरेंमध्ये वाढता संवाद

दरम्यान, अलीकडेच राहुरी येथे झालेल्या टंचाई आणि एसआयआर आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यातील संवादाचीही राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत विविध नेत्यांची भूमिका काय असेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राम शिंदे म्हणाले?

बाजीराव खेमनर यांच्या भेटीनंतर प्रा. राम शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, "ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आलो होतो. विविध विषयांवर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. वयाच्या ९१व्या वर्षीही त्यांची प्रकृती, कार्यतत्परता आणि समाजाविषयीची बांधिलकी प्रेरणादायी आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com