Ahilyanagar Bank Election News : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसाठी होत असलेल्या दहा लढतींची आज मतमोजणी होणार आहे. सोसायटी मतदारसंघातील चार आणि राखीव सहा अशा दहा जागांसाठी जिल्ह्यात तब्बल 99.27 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. बँकेच्या 3 हजार 837 मतदारांपैकी 3 हजार 809 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके (पारनेर), अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे (अकोले), आमदार आशुतोष काळे (कोपरगाव), भाजप आमदार प्राजक्त तनपुरे (राहुरी), भाजपचे माजी आमदार वैभव पिचड (अकोले), प्रतापराव ढाकणे यांचे चिरंजीव ऋषिकेश ढाकणे (पाथर्डी) यांच्या प्रमुख लढतीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. यातल्या यात खासदार लंके यांच्या निकालाची उत्सुकता आहे.
जिल्हा बँकेच्या (DCC Bank) या दहा जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. सकाळी सुरू होणार्या या मतमोजणीचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. यामुळे जिल्हा बँकेवर उर्वरित दहा जागांवर झेंडा कोणाचा याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान बँकेसाठी अकोले, नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये 100 टक्के पूर्ण मतदान झाले आहे. तर सर्वाधिक मतदार असलेल्या संगमनेर (Sangamner) तालुक्यात सर्वाधिक 715 मतदार असून 714 मतदारांनी मतदान केल्याने 99.86 टक्के इतकी भरघोस टक्केवारी नोंदवली गेली. तर सर्वात कमी मतदान झालेले तालुक्यात राहुरी तालुक्यात 98.06 टक्के आणि शेवगाव तालुक्यात 98.29 टक्के मतदान झालेले आहे. अहिल्यानगर शहरातील मतदान केंद्रावर आ. संग्राम जगताप, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उमेदवार संगिता वाघ, हर्षदा काकडे यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते.
अकोले 231 एकूण मतदानापैकी 100 टक्के मतदान झाले. जामखेडमध्ये 115 एकूण मतदान आणि 114 (99.13 टक्केवारी), कर्जत 168 एकूण मतदानापैकी 167 (99.40 टक्केवारी), कोपरगाव 529 एकूण मतदानापैकी 520 (98.30 टक्केवारी), नगर एकूण मतदान 399 मतदानापैकी 387 (98.98 टक्केवारी), नेवासा एकूण 246 मतदानापैकी 100 टक्के, पारनेर एकूण 227 मतदानापैकी 225 (99.12 टक्केवारी), पाथर्डीत एकूण 131 मतदानापैकी 100 टक्के, राहाता एकूण 263 मतदानापैकी 260, राहुरीत 258 मतदानापैकी 253 (98.06 टक्के), संगमनेरमध्ये एकूण 715 झालेल्या मतदानापैकी 714 (99.86 टक्के), शेवगावमध्ये 117 मतदानापैकी 115 (98.29 टक्के), श्रीगोंद्यात एकूण 299 मतदानापैकी आणि श्रीरामपूर एकूण 147 मतदानापैकी 100 टक्के मतदान झाले.
सोसायटी मतदारसंघ: अकोले – आमदार डॉ. किरण लहामटे व संजीवनी शिंदे, कर्जत – तुषार पिसाळ व ज्योती शिंदे, पारनेर- खासदार नीलेश लंके व राहुल शिंदे, राहुरी- आमदार प्राजक्त तनपुरे व सत्यजित कदम. शेतीपूरक – आमदार आशुतोष काळे व सुधीर म्हस्के. महिला (दोन जागा)- हर्षदा काकडे, पुष्पा गायकवाड, मंजुषा गुंड, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, संध्या महांडुळे व संगीता वाघ. अनुसूचित जाती-जमाती- माजी आमदार वैभव पिचड व प्रशांत लोखंडे. इतर मागासर्व-ओबीसी – शिवदास गुंजाळ, कारभारी जावळे, जालिंदर वाकचौरे, कडूचंद शेटे व आजिनाथ हजारे. भटके विमुक्त- सुभाष गिते, ऋषिकेश ढाकणे व गणपतराव सांगळे.
जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी तालुकानिहाय मतदान केंद्रनिहाय 14 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आधी सोसायटी मतदारसंघातील चार जागांची मतमोजीणी करण्यात येणार आहे. या मतमोजणीचा स्वतंत्रपणे निकाल जाहीर झाल्यानंतर राखीवच्या सहा जागांसाठी मतमोजणची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सुरूवातील मतपत्रिकांचा रंग आणि मतदारसंघनिहाय त्या जुळवून त्यांचे गठ्ठे तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर आकडेवारीच संकलित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सोसायटी मतदारसंघातील सर्वात प्रतिष्ठेची आणि निकराची लढत ही पारनेर सोसायटी मतदारसंघात झालेली आहे. या ठिकाणी खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने ताकद लावण्यात आलेली आहे. यामुळे या ठिकाणी लंके यांना चितपट करणार की ते तालुक्यावरील वर्चस्व सिध्द करणार यासाठी आज दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.