Amol Khatal : महिलांची तक्रार अन् आमदार खताळ थेट दारू अड्ड्यावर! जनावरांच्या चाऱ्याखाली लपवला होता अवैध दारूसाठा

Women complained about illegal liquor sales Sangamner Girhewadi. MLA Amol Khatal joined police raid that uncovered liquor bottles hidden under animal fodder : संगमनेरच्या गिऱ्हेवाडीत आमदारांची पोलिसांसह धडक कारवाई; दारू विक्री पुन्हा सुरू न करण्याचे स्पष्ट निर्देश, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह.
Amol Khatal
Amol KhatalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Illegal liquor sale in Sangamner : दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना, संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार परिसरातील गिऱ्हेवाडीतील महिलांना मात्र अवैध दारू विक्रीच्या समस्येचा सामना करावा लागत होता.

घरातील कर्ते पुरुष दारूच्या आहारी गेल्याने दिवसभराची कमाई व्यसनावर खर्च होत होती. एवढेच नव्हे, तर लहान मुलेही व्यसनाधीन होण्याची भीती महिलांनी व्यक्त केली. सणासुदीच्या काळातही कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि दिवाळी साजरी करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर स्थानिक महिलांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे धाव घेतली.

'साहेब, तुम्ही आम्हाला दिवाळीचा आनंदाचा शिधा दिला आहे; मात्र घरातील कर्ते पुरुष दारू पिऊन पैसे खर्च करत असतील, तर हा आनंदाचा शिधा आम्ही खायचा तरी कसा?' अशा शब्दांत महिलांनी आमदार खताळ यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. महिलांची परिस्थिती ऐकून आमदार खताळ यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी घारगाव पोलिसांना (Police) कारवाईच्या सूचना दिल्या. मात्र, केवळ सूचना देऊन न थांबता आमदार खताळ स्वतः तक्रारदार महिलांसह गिऱ्हेवाडीतील अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोहोचले.

महिलांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार खताळ आणि पोलिसांनी परिसरात दारूच्या साठ्याचा शोध सुरू केला. या ठिकाणी एक महिला (Women) अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली. मात्र, सुरुवातीला शोध घेऊनही दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान, आमदार खताळ आणि पोलिस दारू अड्ड्यावर येणार असल्याची माहिती आधीच फुटल्याची चर्चा परिसरात रंगली.

Amol Khatal
Sujay Vikhe Patil: 'उपोषणाने पाऊस पडत असेल तर बसा' सुजय विखेंची टोलेबाजी

अखेर घारगाव पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता, जनावरांच्या चाऱ्याखाली लपवून ठेवलेल्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी हा अवैध दारूसाठा जप्त केला. यावेळी संबंधित महिला दारू विक्रेत्याने साकूर येथील मुख्य दारू विक्रेता शंकर खेमनर याला हप्ता द्यावा लागत असल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

Amol Khatal
INDIA Alliance Rally : 'इंडिया आघाडीला दुसरा मुद्दाच मिळत नाही!' अमृता फडणवीसांचा राहुल गांधींना टोला; CM पतीने केलेल्या टीकेला पत्नीचीही साथ

दरम्यान, 'हा दारू विक्रीचा अड्डा पुन्हा सुरू होता कामा नये,' असे स्पष्ट निर्देश आमदार खताळ यांनी पोलिसांना दिले. आमदारांच्या या कारवाईनंतर गिऱ्हेवाडी, पायरवाडी आणि सुतारवाडी परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले. मात्र, लोकप्रतिनिधीला प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागल्याने संगमनेर पोलिसांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.