Ahilyanagar extortion case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Industrialist extortion case : मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश, ‘कायद्याने ठोकून काढा’; अरुण गवळीच्या पंटरची पहिली विकेट, MIDC मधील खंडणी प्रकरण तापणार!

Bhausaheb Unawane Booked for Extortion in Ahilyanagar MIDC Police Register FIR Against Kamgar Sena Leader : एमआयडीसीमधील उद्योजकाकडे खंडणी मागणाऱ्याला अहिल्यानगर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कायद्याचा दणका दिला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar extortion case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकताच पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी इथं दौरा केला. तिथं त्यांनी उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना, खंडणी मागणाऱ्यांना कायद्याने ठोकून काढा, असे निर्देश दिले होते.

याचा प्रत्यय आता यायला सुरवात झाली असून, पहिला दणका अरुण गवळी याच्या अखिल भारतीय कामगार सेनेला बसला आहे. या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर उद्योजकांकडे प्रति महिना एक लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रताप एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

अखिल भारतीय कामगार सेनेचा सदानंद दयानंद उनवणे ऊर्फ भाऊसाहेब, राजेश पाटील व त्याचे इतर चार साथीदारांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी (Police) गुन्हा नोंदवला आहे. भाऊसाहेब उनवणे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत सुनावली आहे.

निंबळक इथल्या एमआयडीसीच्या (MIDC) सुयश मेटल प्रोसिंग्स कंपनीत नऊ फेब्रुवारीला भाऊसाहेब उनवणे आणि त्याचे साथीदारांनी बेकायदेशीरपणे कंपनीत प्रवेश केला. कंपनीचा व्यवस्थापक प्रकाश कोकाटे यांना शिवीगाळ, दमदाटी करून काम बंद करण्यास सांगितले. कंपनीतील काम चालू ठेवायचे असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जीवे ठार करू, अशी धमकी दिली.

भाऊसाहेब उनवणे याने कंपनीचा व्यवस्थापक कोकाटे यांच्याकडे लगेच खंडणी मागितली. कोकाटे यांनी विरोध केल्यावर त्याच्याकडून दमदाटी करून, 20 हजार रुपये काढून घेतले. याशिवाय भाऊसाहेब उनवणे व त्याच्या साथीदारांनी सर्व कामगारांना बोलवून त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली.

उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची करून दिली आठवण

एमआयडीसीमधील कंपनीच्या उद्योजकांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, संबंधित गुंडाविरोधात कारवाई करण्याचे निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पारनेर दौऱ्यात केलेल्या, कायद्याने ठोकून काढा, या आदेशाकडे उद्योजकांनी या वेळी लक्ष वेधले.

अधीक्षकांच्या आदेशानंतर गुन्हा

पोलिस अधीक्षकांनी एमआयडीसी पोलिसांना भाऊसाहेब उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(5), 308(4), 329(4), 189(2), 191(2), 190, 325, 351(2), 324(3) प्रमाणे गुन्हा करण्यात आला.

भाऊसाहेब उनवणेची गुन्हेगारी पार्श्वभूमी

भाऊसाहेब उनवणे याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असून, त्याच्याविरोधात तोफखाना आणि कोतवाली पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन, असे चार गुन्हे दाखल झाले आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल घडवणे, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, संगनमताने गुन्हे करणे, कट कारस्थान करणे, आर्म अ‍ॅक्ट, धमक्या देणे आदी कलमान्वये गुन्ह्याच्या नोंदी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT