RSS registration issue : ‘RSS’च्या कायदेशीर नोंदणीसाठी कायदा आणणार; प्रियांक खर्गेंनी ठोकला शड्डू!

Priyank Kharge Warns of Law for RSS Legal Registration : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कायदेशीर नोंदणीसाठी कायदा आणण्याचा इशारा काँग्रेसचे प्रियांक खर्गे यांनी दिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
RSS registration issue
RSS registration issueSarkarnama
Published on
Updated on

Congress vs RSS controversy : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी न झाल्यास सरकार कायदा आणेल, असा इशारा कर्नाटकमधील काँग्रेसचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री प्रियांक खर्गे यांनी दिला. गेल्या 24 तासात मंत्री खर्गे यांनी संघाला चांगलंच टार्गेट केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैत्यासारखा असून भाजप हा त्या दैत्याची सावली आहे. सावलीशी लढण्यापेक्षा दैत्याशीच लढले पाहिजे, असेही विधान बंगळूर इथल्या कार्यक्रमात केले होते. आज तर मंत्री खर्गे यांनी संघाच्या नोंदणीचा मुद्दा उचलून धरत, नोंदणीसाठी थेट कायदा आणण्याचा इशारा दिल्याने काँग्रेसविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप, असं वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

काँग्रेसचे (Congress) कर्नाटकमधील नेते मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले, "देशासाठी एक नियम आणि आरएसएससाठी दुसरा, असे का? आरएसएस देणग्या स्वीकारणारी संघटना आहे. तिची नोंदणी नाही. ते कायद्याच्या विरोधात आहे." आरएसएसला प्रश्न विचारला की, भाजपचे नेते त्याचे उत्तर देतात. ते संघाचे प्रवक्ते आहेत का? असा टोला देखील खर्गे यांनी लगावला.

भाजप (BJP) नेत्यांची मुले संघाचा गणवेश परिधान करतात का? असा सवाल करत त्यांनी काहींना संघनिष्ठेमुळेच विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. आरएसएस हिंदूंनी तीन मुले जन्माला घालावीत असे सांगते, मग त्यांचे नेते ब्रह्मचारी का आहेत? याचा पुनरूच्चार मंत्री खर्गे यांनी केला.

RSS registration issue
Black box damage controversy : अजित पवारांच्या विमान अपघातात गूढ वाढलं! दोन्ही रेकॉर्डर खराब, टेल मात्र सुरक्षित; मिटकरींची मोठी शंका!

दरम्यान, बंगळूर इथल्या कालच्या कार्यक्रमात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैत्यासारखा असून, भाजप हा त्या दैत्याची सावली आहे. सावलीशी लढण्यापेक्षा दैत्याशीच लढले पाहिजे', असे खळबळजनक विधान केले होते.

RSS registration issue
RSS criticism : ‘संघ हा दैत्यासारखा’! मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विधानानं राजकीय वाद

संघाकडे येणाऱ्या देणग्यांबाबत पारदर्शकता नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नोंदणी करणे आवश्यक असून त्यांना लवकरच ती कार्यवाही करावी लागेल; अन्यथा मीच ती करायला लावेन, असेही मंत्री खर्गे म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com