Sangram Jagtap 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Drugs & Gym Jihad : लव्ह ते ड्रग्ज-जिम जिहाद, अहिल्यानगरमध्ये काय चाललंय? संग्रामभैय्यांनी ‘मिनी पाकिस्तान’चा धोका सांगत पोलिसांना सुनावलं

Ahilyanagar Drugs & Gym Jihad: Sangram Jagtap Leads March to SP Office : ड्रग्ज अन् अंमलीपदार्थात कारवाईसाठी अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला होता.

Pradeep Pendhare

Ahilyanagar drugs case : अहिल्यानगरमधील ड्रग्ज, अंमली पदार्थाच्या वाढलेल्या तस्करीत, कायद्याचा धाक राहिला नाही. ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे थेट अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचली.

लव, लँड जिहादनंतर आता ड्रग्ज अन् जीम जिहाद सुरू आहे. अहिल्यानगर पोलिसांना मिनी पाकिस्तान आव्हान देत आहे. तिथल्या काही प्रवृत्तींना ठेचून काढावं लागेल. असे म्हणत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर पोलिस दलाच्या गुन्हे कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केली.

अहिल्यानगर शहरातील ड्रग्ज जिहाद्यांवर कारवाईसाठी, आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता. पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर आमदार जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधना, शहरातील विशिष्ट समुदायाच्या जास्त भागाचा थेट मिनी पाकिस्तान, असा उल्लेख करत खळबळजनक दावे केले.

संग्राम जगताप म्हणाले, "अहिल्यानगर पोलिस (Police) मुख्यालयातील ट्रकचा मुद्देमाल गायब झाला, हा प्रकार उघडकीस आला, तो पुणे ग्रामीण पोलिसांमुळे! या प्रकरणाचे धागेद्वारे पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत आले. परंतु प्रशासनाने ते काही गांभीर्याने घेतले नाही. यानंतर लगेचच, तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमडी ड्रग्जचे, गुंगींचे इंजेक्शन पकडली गेली."

तसेच, 'निवडणुकीच्या काळात देखील सहा ते सात युवकांनी ड्रग्ज सेवन केल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यामुळे ते बचावले. डॉक्टरने देखील त्यांची प्रकृती नाजूक सांगितली होती. त्याची सुद्धा पोलिसांना माहिती नाही. ही शोकांतिका आहे. पोलिसांनाच माहिती मिळत नसेल, तर पोलिस किती अलर्ट आहे, याचा हा अनुभव येतो. पण हे दुर्दैवी आहे. अमली पदार्थाच्या ज्या टोळ्या तयार झाल्या, त्यांना कुठेतरी राजाश्रय आहे का? हे तपासले पाहिजे. प्रशासन यांना कुठे पाठीशी घालत आहे का? हा प्रश्न देखील नागरिकांच्या मनामध्ये आहे,' अशी शंका संग्राम जगताप यांनी उपस्थित केली.

जिममध्ये ट्रेनर एकाच जमातीचे...

"अहिल्यानगर शहरातील जिममध्ये ट्रेनर एकाच जमातीमधील आहे, याकडे लक्ष वेधताना संग्राम जगताप म्हणाले, "90 टक्के हेच लोक जिममध्ये कसे, यातूनच कुठेतरी जिम, ड्रग्ज, लँड आणि लव्ह जिहाद पाहायला मिळतो." सुरुवातीला फक्त लव्ह जिहाद पाहायला मिळत होता. यानंतर धार्मिक स्थळांवर अतिक्रमण सुरू होत, लँड जिहाद सुरू झाला. निवडणुका आल्यावर डॅग्ज जिहाद सुरू झाला. आता जिम जिहाद आणि ड्रग्ज देखील आम्हाला ऐकायला मिळतो आहे. हे दुर्दैव आहे आणि यावर पोलिसांनी कारवाई व्हायला पाहिजे," अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली.

पाकिस्तानच्या पासिंग गाड्या...

महाविद्यालयांमध्ये विना नंबरच्या गाड्या शहरातून, पोलीस अधीक्षक कार्यालयातील चौकासमोरून जातात. काही जण ट्रिपल सीटवर जाणारे दिसतात. अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षक चौकात भविष्यामध्ये पाकिस्तानच्या पासिंग असलेल्या गाड्या सुद्धा दिसतील. सिग्नल तोडले, दुचाकीवर नंबर नसणे, हे सर्व पोलिस अधीक्षक चौकामध्ये, असे प्रकार घडत आहे, हे पोलिसांनाच आव्हान आहे. पोलिसांना देखील हे समजत नाही. हे दुर्दैवी आहे, असा घणाघात संग्राम जगताप यांनी केला.

प्रवृत्ती ठेचून काढावी लागणार

'अहिल्यानगर शहर पोलिसांनी मध्यंतरी मोहीम हाती घेत, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर कारवाई केली होती. मिनी पाकिस्तान मधून या गाड्या बाहेर यायच्या, त्यांच्या सायलेन्सर कारवाई केली, त्यांचं अभिनंदन आहे. परंतु अजून दहा-वीस टक्के लोक राहिलेले आहेत, ते देखील आता ठेचून काढावे लागतील. रात्री 10 ते 11 च्या पुढे बाहेर निघतात. विशेष करून बस स्थानक परिसरामध्ये ते असतात. आमच्या समाजाच्या महिलांपर्यंत ते जाण्याचा प्रयत्न करतात, याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे,' अशी मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT