Sharad Pawar NCP merger : एक पाऊल मागे, दोन पुढे! विलिनीकरण थांबले तरी, ठाण्यात राष्ट्रवादीचा ‘सायलेंट स्ट्राईक’, विरोधकांची झोप उडाली

Ajit Pawar NCP to Get Opposition Leader Post in Thane? Manoj Pradhan Signals : ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने सकारात्मक प्रतिसाद घेतला आहे.
Sharad Pawar NCP merger
Sharad Pawar NCP mergerSarkarnama
Published on
Updated on

Thane Municipal Corporation politics : राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे, कधी-कोणता निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निर्णयाकडे लक्ष लागले असतानाच, ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

विलिनीकरण झाल्यास अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेता पद दिले जाईल. विलिनीकरण न झाल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे विरोधी पक्षनेता पद राहील. या निर्णयावर शरद पवार राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी देखील दुजोरा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी, विलिनीकरण झाले, तर विरोधी पक्षनेतेपद अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यास आमची कोणतीही हरकत नाही; मात्र विलिनीकरण न झाल्यास संख्याबळाच्या आधारे हे पद आमच्याकडेच राहील, अशी भूमिका घेतली आहे. मनोज प्रधान यांच्या या भूमिकेमुळे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे.

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता विरोधी पक्ष नेतेपदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाला 12, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पाच, तर AIMIMचे पाच नगरसेवक आहेत. मात्र या तिन्ही पक्षांनी कोकण विभागकडे स्वतंत्र नोंदणी केल्याने सर्वाधिक नगरसेवक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट हा महापालिकेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद आमच्याच पक्षाला मिळावे, अशी ठाम भूमिका या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे.

Sharad Pawar NCP merger
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’वर राजकीय डाव? महिलांची फसवणूक, गावकऱ्यांचा संताप; ठाकरेसेनेनं शिंदेसेनेला पळवलं!

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी विरोधी पक्ष नेतेपदाबाबत दोन्ही पर्याय खुले असल्याचे सांगितले. यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय होईल, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाल्यास ज्येष्ठतेचा विचार करून नजीब मुल्ला यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्याची तयारी असल्याचे मनोज प्रधान यांनी सांगितले. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने विलिनीकरणाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता यावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar NCP merger
NCP Internal Politics : 'अनसिक्युअर कोण?' नीलेश लंकेंच्या एका वाक्यानं राष्ट्रवादीत संशयाचं वादळ!

नियम काय सांगतो

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि AIMIM या तिन्ही पक्षांनी कोकण विभागाकडे स्वतंत्र नोंदणी केली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत अधिक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे; मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम यांनी एकत्र येऊन दावा करायचा असल्यास त्यासाठी प्रथम अधिकृत विलिनीकरण आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com