Mahayuti government meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti Chondi meeting news : चौंडी मंत्रिमंडळ बैठक; नियोजनासाठी 17 समित्या, विस्तीर्ण मंडप उभारणीची तयारी, राज्य सरकारकडून 2 कोटींचा निधी

Mahayuti Cabinet Meeting in Jamkhed Chondi Committees Appointed Pandal Setup Begins Ahilyanagar : अहिल्यानगरमधील चौंडी (ता. जामखेड) इथं सहा मे रोजी होत असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची युद्धपातकळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar cabinet meeting : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड) इथं सहा मे रोजी राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यादांच ग्रामीण भागात अशी बैठक होत आहे. बैठकीला तीनच दिवस राहिल्यानं जिल्हा प्रशासनाची नियोजनासाठी धावपळ उडाली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी होत असताना, त्यांच्याच जन्मगावी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने, यात मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याने ही बैठक यशस्वी होण्यासाठी राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने बैठकीच्या तयारीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी ज्या ठिकाणी होतो, त्याच मैदानावर बैठकीसाठी विस्तीर्ण, असा मंडप उभारला जात आहे. 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद आकाराचा 'जर्मन हँगर' प्रकारचा मंडप उभारला जात आहे. मंडपात विविध वातानुकूलित कक्ष निर्माण केले जातील. मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन रुम, भेटीसाठी येणारे आमदार-खासदार, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी कक्ष, मुख्य सचिवांचे कार्यालय, मंत्री परिषद सभागृह, स्वयंपाकघर, भोजन, पत्रकार कक्ष, सुरक्षा व वाहनचालक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या मंडपात किमान साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. इंटरनेटसाठी (वाय-फाय) व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणीच्या कामाबरोबर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या कार्यालयातील पथक पुढील दिवस चौंडीत तळ ठोकणार आहे. नाशिकचे (Nashik) विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आज शनिवारी चौंडी इथं येत अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेणार आहे. यावेळी भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नियोजनासाठी तब्बल 17 समित्यांची नियुक्ती केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक 29 एप्रिलला होणार होती. परंतु आता ती सहा मे रोजी होत आहे. विस्तीर्ण मंडपाबरोबर रस्ते, हेलिपॅड उभारले जात आहे. हेलिपॅडकडून बैठकस्थळाकडे तसेच विश्रामगृहाकडे येणारे रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. राज्य सरकारने नियोजनासाठी 2 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहे.

या बैठकीवर होणाऱ्या खर्चावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त करत आहे. खर्चाच्या निविदातील आकड्यांच्या गोंधळावरून महायुती सरकार टीकेची धनी ठरली. त्यामुळे या बैठकीवर किती खर्च होणार, याकडे विरोधकांकडे आता लक्ष असणार आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा विचार केल्यास कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे एकूण 42 जण उपस्थित राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT