Maharashtra cabinet meeting 3 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti government cabinet meeting : CM फडणवीसांसह चौंडीला येणारे मंत्रिमंडळ 'पुरणपोळी', 'शिपी आमटी', 'शेंगोळ्यां'वर ताव मारणार; सभापती शिंदे जेवणाचा खर्च उचलणार

Mahayuti Cabinet Meeting at Chondi Bjp Ram Shinde to Bear Dinner Expenses : महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची सहा मे रोजी जामखेडच्या चौंडी इथं होणार्‍या बैठकीला होणार्‍या जेवणाचा खर्च विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे उचलणार आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra cabinet meeting 2025 : चौंडी (ता. जामखेड) इथं होणारी महायुती सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठकीवर दीडशे कोटींच्या खर्चामुळे चर्चेत आली होती. या बैठकीची सुरुवातीची तारीख 28 एप्रिल काढण्यात आली होती. परंतु आती ही बैठक सहा मे रोजी होणार आहे. त्यामुळे या बैठकीवर किती खर्च होणार, हा मुद्दा पुन्हा तापला असतानाच, या बैठकीसाठी जेवणाचा होणारा सर्व खर्च विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उचलणार आहे.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, 36 मंत्री, सहा राज्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी, पोलिस बंदोबस्त, राज्यातून येणारे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जवळपास दोन ते तीन हजार व्यक्तींचा जेवणाचा हा खर्च असणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा जेवणाचा मेन्यू देखील समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने पूर्वी ठरवलेलाच मेन्यू कायम असणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने पहिल्यादांच महायुतीच्या राज्य सरकारची चौंडी (ता. जामखेड) इथं मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक होत आहे. ही बैठक पूर्वी 28 एप्रिलला होणार होती. परंतु ती तारीख पुढे ढकलण्यात आली. ही बैठक आता सहा मे रोजी होत आहे. या बैठकीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

या बैठकीच्या तयारीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. मंडप, ध्वनिक्षेपक, व्यासपीठ, शामियाना, ग्रीन हाऊस, असं सर्व मिळून नियोजनासाठी तब्बल दीडशे कोटी रुपयांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवातीला प्रसिद्ध झाली होती. त्यावरून महायुती सरकारवर चहूबाजूने टीका झाली. तीन तासांच्या बैठकीवर महायुती (Mahayuti) सरकार एवढी उधळपट्टी करणार म्हटल्यावर विरोधकांनी जोरदार तोंडसुख घेतले.

महायुती सरकार टीका होऊ लागल्यानंतर मंत्र्यांनी प्रशासनाच्या चुकीवर चांगलेच कान टोचले, सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा निविदा प्रसिद्ध करत या बैठकीच्या नियोजनावर सुमारे 1 कोटी 28 लाख रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले. तशी पुन्हा दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध केली. आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची तारीख निश्चित झाल्यानंतर प्रशासन पुन्हा कामाला लागलं असून जोरदार तयारी सुरू केली आहे. तरी देखील बैठकीवर होणारा खर्चाचा विषय चर्चेतच आहे.

दरम्यान, या बैठकीसाठी मंत्र्यासह राज्यातून दोन ते तीन हजार लोकं येण्याची शक्यता आहे. या सर्व जेवणाचा खर्च विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उचलणार आहेत. जिल्हा प्रशासनाने बैठकीसाठी पूर्वी ठवरलेला मेन्यू त्यासाठी कायम ठेवण्यात आला आहे. चौंडी (ता. जामखेड) इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रा. राम शिंदे इथं राज्यासह देशभरातून येणाऱ्यांना जेवण देतात. तिच परंपरा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्तानं प्रा. राम शिंदे जपणार आहेत.

पुरणपोळी, शिपी आमटी, मासवडी, शेंगोळे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या कर्जतची शिपी आमटी, पुलाव, पुरणपोळी, कुरडई, थालीपीठ, खवा पोळी, मासवडी, आमटी भाकरी, कोथिंबीर वडी, हुरडा थालीपीठ, शेंगोळे, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, मटकी, मसाला वांगे, स्पेशल शिंगोरी आमटी, भात, बाजरी भाकरी, दही-धपाटे, आमरस चपाती, वांगी भरीत भाकरी, हुलग्याचे शेंगोळे, आलू वडी, मूग भजी, शेवगा भाजी, शिंगोरी आमटी-ठेचा-भाकरी, भाकरी थाळी, म्हैसूर बौंडा, मांडे, बीट थालपीठ या महाराष्ट्रीयन मेन्यूचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT