Pooja Khedkar Controversy : नऊ महिन्यानंतर पूजा खेडकर आली समोर; खोटे दिव्यांग प्रमाणपत्र, ओबीसी दाखला अन् 'त्या' आरोपांवर स्पष्टच बोलली

Pooja Khedkar appears before Delhi Police for questioning : कोर्टाने माझ्याकडे तशेरे ओढले असे म्हटले जाते मग आपल्याकडे हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्ट का आहे?
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pooja Khedkar News : यूपीएससीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र, तसेच वडिलांच्या नावात फेरफार करून वारंवार परीक्षा दिल्या प्रकरणी परिविक्षाधीन IAS अधिकारी आज (शुक्रवारी) दिल्ली पोलिसांच्या समोर हजर झाली. पोलिसांच्य चौकशीला समोर जाण्यापूर्वी तिने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर तिने स्पष्टीकरण दिले. पूजावर होत असलेल्या आरोपानंतर तब्बल ती नऊ महिन्यानंतर माध्यमांच्या समोर आली.

पूजा म्हणाली, 'मी दिव्यांग प्रमाणपत्र दिलं आणि ते यूपीएससीने स्वीकारले असे होत नाही. त्यांचा स्वतःचा 12 डाॅक्टरांचा बोर्ड आहे. 12 डाॅक्टरांनी तीन वर्षात माझा सहावेळा तपास केला आहे. एम्सच्या आणि सर्फरजंग या दोन्ही रुग्णालयांनी 12 डाॅक्टरांनी मला सर्टिफाय केलंय. त्यामुळे मी सांगते की मीडिया समोर खुप चुकीची माहिती आली आहे.'

Pooja Khedkar
India vs Pakistan : PM मोदींनी एकच निर्णय घेतलाय... तोच कायम ठेवला तर हल्ला न करताही पाकिस्तानचा 'बाजार उठू शकतो...'

'मी कुठलीही बनावट कागदपत्र सादर केलेली नाही. यूपीएससीकडून देण्यात आलेल्या तक्रारमध्ये, एफआयआरमध्ये मी बनावट कागदपत्रे दिल्याचे म्हटले नाही. किंवा माझे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे आहे असे कुठेही म्हटले नाही.', असे देखील पूजाने सांगितले.

पूजावर कोर्टाने ताशेरे ओढले होते त्याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली, 'कोर्टाने माझ्याकडे तशेरे ओढले असे म्हटले जाते मग आपल्याकडे हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्ट का आहे? कारण मीस इंटरप्रिटेशन होऊ शकतं. कोर्टाकडून होऊ शकतं. त्यांना काही पाॅईंट वाटले असतील. त्यामुळेच मी सुप्रीम कोर्टात अपील केले आहे.'

अटकेपासून संरक्षण

पूजा खेडकरवर बनवाट कागदपत्रे सादर करून तसेच दिव्यांगाचे बनावट कागपत्राद्वारे IAS केडर मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोर्टाने पूजाला चौकशीसाठी आज (दोन मे) दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये कोर्टाने पूजाला अटकेपासून संरक्षण देखील दिले आहे. पूजाला जबरदस्तीने अटक करता येणार नसल्याचे कोर्टाने म्हटले होते.

Pooja Khedkar
Pahalgam attack : "देश संकटात, चिंता नाही, मनोरंजन सृष्टीतील लोकांसोबत 9 तास रमतात, टाळ्या वाजवतात..."; ठाकरे गटाचा PM मोदींवर हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com