Kale Kolhe Parjane Kopargaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kale Kolhe Parjane Kopargaon : काळे, कोल्हे अन् परजणेमध्ये रंगली जुगलबंदी; एकमेकांनी एकमेकांचा 'इतिहास' काढला

Ahilyanagar NCP MLA Ashutosh Kale BJP Vivek Kolhe and Rajesh Parjane Seen Together at Event in Kopargaon : व्यापार एकता दिनाचे औचित्य साधत कोपरगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, भाजप युवानेते विवेक कोल्हे, राजेश परजणे एकत्र आले होते.

Pradeep Pendhare

Ahilyanagar politics news : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतींमुळे राजकीय समीकरणं चांगलीच बदलली आहे. आघाडी अन् युतीमुळे कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्पर्धा वाढली, तर काही प्रतिस्पर्धी एकत्र आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये महायुतीमुळे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आले. काळे अन् कोल्हे यांच्यातील 50 वर्षांचा राजकीय संघर्ष जिल्ह्यासह राज्यातील जुन्या जाणत्या राजकीय नेत्यांना चांगलाच माहिती आहे.

या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कूटनितीनं काळे-कोल्हे एकत्र आले. आता तर काळे-कोल्हे यांच्याबरोबर परजणे देखील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. 'स्थानिक निवडणुकी'पूर्व हे त्रिकूट एकत्र आल्यानं कोपरगावमधील बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा वेगळ्याच पातळीवर होऊ लागली आहे.

व्यापार एकता दिनाचे औचित्य साधत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आशुतोष काळे, भाजपचे युवानेते विवेक कोल्हे, राजेश परजणे कोपरगावध्ये एकत्र आले होते. यावेळी तिघांनी सिंचनाचा पाणीप्रश्‍न, अधिकाऱ्यांवर न राहिलेला वचक, विधानसभेला दिलेली साथ व मताधिक्य यावरून तिघांमध्ये चांगलेच जुगलबंदी रंगली.

आमदार आशुतोष काळे यांनी

कोपरगावमध्ये (Kopargaon) विविध विभागांचे अधिकारी चांगले कामे करण्याचा प्रयत्न करत आहे. जर काही चुका होत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. सुरुवातीला मी सॉफ्ट भाषेत सांगतो; मात्र त्यांच्याकडून काही चुका झाल्यास प्रसंगी त्यांच्या विरोधात पुढची स्टेप घेण्यास कचरणार नाही. तुम्ही विश्‍वास ठेवलाय ना, काळजी करू नका, असे उपरोधिक भाष्य आमदार आशुतोष काळे यांनी युवानेते विवेक कोल्हे यांच्या बोलण्यावर केले.

कोल्हेंनी व्यक्त केली खंत

विवेक कोल्हे यांनी राज्य सरकारने काढलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या सूचीमध्ये कोपरगाव तालुका अपात्र ठरला. तालुक्यातील एकही अधिकारी त्यात पात्र झाला नाही. कुठे तरी अधिकाऱ्यांवरील लोकप्रतिनिधी म्हणून आपला वचक कमी होतो की काय, अशी कोपरखळी लगावली. बाजारपेठ सुरक्षित ठेवायची असेल, तर वारंवार होणाऱ्या गुन्ह्यांवर ही आळा घातला पाहिजे. विधानसभेला आमदारांना मोठे मताधिक्य दिले, पाण्यासाठी त्यांनी पण प्रयत्न करावे, असेही कोल्हे यांनी म्हटले.

काळेंनी कोल्हेंना केलं आश्वस्त

कोल्हे यांच्या कोपरखळीवर आमदार काळे यांनी, तुम्ही विश्‍वास ठेवलाय ना, बाकीचे मी पाहून घेतो. तुम्ही काळजी करू नका, अधिकारी सुद्धा माणसेच आहेत. त्यांच्या विरोधात लगेच पुढची स्टेप टाकायची गरज नाही. त्यांच्याकडून व्यवस्थित कामे करून घेण्यात येतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर त्या दृष्टीने काळजी घेवू याची ग्वाही देतो, असे सांगितले. जर काही चुका होत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. सुरुवातीला मी सॉफ्ट भाषेत सांगतो; मात्र त्यांच्याकडून काही चुका झाल्यास त्यांच्या विरोधात पुढची स्टेप घेण्यास कचरणार नाही, असे आमदार काळे यांनी कोल्हे यांना आश्वस्त केले.

परजणेंच्या सोयीच्या राजकारणावर कोल्हेंचा टोला

शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे यांनी शेतीच्या पाणीप्रश्‍नी मोठा संघर्ष केला, आंदोलने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समुद्राला जाणारे पाणी वळविण्यासाठी मोठी भूमिका घेतली आहे. सध्या दोन्ही युवानेत्यांची चलती आहे. पाणीप्रश्‍नी राजकीय जोडे बाजूला ठेवून त्यांनी पुढाकार घ्यावा, असे राजेश परजणे यांनी म्हटले.

कोयटेंची परजणेंना कोपरखळी मारताच हशा

विवेक कोल्हे यांनी पाणीप्रश्‍नी परजणे यांनी सोयीस्कररित्या स्ट्राईक आमच्याकडे दिली. तुमच्यासह सर्वांना याबाबत पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले. काका कोयटे यांनी परजणे तुमचे सुद्धा मोठे वजन आहे. दोन्ही नेत्यांवर जबाबदारी ढकलता येणार नाही. आपल्या जावयांना तुम्हालाही याबाबत सांगावे लागेल, असे म्हणताच एकच हश्या पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT