Yashomati Thakur On Satyajeet Tambe : यशोमती ठाकूर सत्यजीत तांबेंवर भडकल्या; म्हणाल्या, 'त्यांनी मोदींना फोन लावावा...' (VIDEO)

Congress Yashomati Thakur Criticizes Nashik graduate MLC Satyajeet Tambe for Comments on Rahul Gandhi : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांन राहुल गांधी मिळत नसल्याच्या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी हल्ला चढवला.
Yashomati Thakur On Satyajeet Tambe
Yashomati Thakur On Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Yashomati Thakur vs Satyajeet Tambe : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे.

अमरावतीच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सत्यजीत तांबे यांना चांगलच सुनावलं आहे. 'सत्यजीत तांबेंनी मोदींना फोन लावावा. याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणीही मोदींना फोन करावा, मोदीजींनी तासाभरात कुणाला अपॉइंटमेंट दिली, तर मग आम्ही पण तसंच बोलू शकतो', असा टोला ठाकूर यांनी आमदार तांबे यांना लगावला.

नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी सकाळ माध्यम समूहच्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधताना, काँग्रेस नेते राहुल गांधी अ‍ॅक्सेसेबल नाही, असा दावा करताना, महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यानं एका तासांत त्यांची भेट घेऊन दाखवावा, असे म्हणत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना चॅलेंज केलं होतं.

आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविषयी केलेल्या या विधानावरून राज्यात चांगली राळ उडाली आहे. 'NSUI' अध्यक्ष अमीर शेख यांनी सत्यजीत तांबेंवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर आता अमरावतीच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी देखील सत्यजीत तांबे यांच्या या विधानावर संतापल्या आहेत.

Yashomati Thakur On Satyajeet Tambe
Prakash Ambedkar Mumbai rains : भाजप, शिवसेना, NCP, काँग्रेस लुटारू, यांना हकला; प्रकाश आंबेडकर संतापण्यामागे आहे 'हे' कारण...

यशोमती ठाकुर म्हणाल्या, "सत्यजीत तांबे काँग्रेसचे आहेत आणि आता ते अपक्ष निवडून आलेत. सत्यजीत तांबे यांनी मोदींना फोन लावावा. याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणीही मोदींना फोन करावा, मोदीजींनी तासाभरात कुणाला अपॉइंटमेंट दिली, तर मग आम्ही पण तसंच बोलू शकतो". राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात भेट देतात..प्रत्येक पक्षाचा आपापला प्रोटोकॉल असतो, असे देखील यशोमती ठाकुर यांनी म्हटल्या.

Yashomati Thakur On Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Rahul Gandhi : राहुल गांधींनी यांना 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट', असा मेसेज करावा का? 'NSUI'चे शेख यांनी आमदार तांबेंना धू-धू धुतले (VIDEO)

प्रत्येक पक्षाचा वेगवेगळा प्रोटोकॉल असतो. तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो. तसा करावा देखील लागतो. राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये भेटतात, बोलतात आणि समन्वयक देखील साधला जातो. ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केलाय, अलिप्त राहण्याचा विचार केलाय, त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला देखील यशोमती ठाकुर यांनी सत्यजीत तांबे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com