Ahilyanagar News : भाजचे माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविषयी वाचाळपणा करणारे विखेंचे समर्थक वसंतराव देशमुख (वय 83) याला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.
अहमदनगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने ही कारवाई केली असून, वसंतराव देशमुख याला संगमनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांची संगमनेरमधील धांदरफळ इथं सभा झाली होती. या सभेत विखे समर्थक म्हणून वसंतराव देशमुख सहभागी झाला होता. तसा त्याने गळ्यात भाजपचा पंचा देखील घातला होता. सभेत त्याने जोरदार भाषण केले. वसंतराव देशमुख याने जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान या सभेत केले.
वसंतराव देशमुख याच्या आक्षेपार्ह विधानावरून संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण झाले. हिंसाचार उफळला. सभेत सहभागी झालेले 'टार्गेट' झाले. वाहनांवर दगडफेक झाली. वाहने जाळली गेली. याप्रकरणी संगमनेर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल. तत्पूर्वी वसंतराव देशमुख पसार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
वसंतराव देशमुख याच्या शोधासाठी संगमनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसंतराव देशमुख याला पुण्यातून आज ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले. यानंतर भाजप आणि महायुतीवर विरोधकांनी राज्यभरातून टीका झाली आणि होत आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थित, त्यांच्या सभेत हा प्रकार झाला होता.
वसंतराव देशमुख याच्या विधानाचा सुजय विखे आणि त्यांच्या परिवाराने देखील निषेध केला. या विधानाचा भाजपचा आणि महायुतीचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. तसंच वसंतराव देशमुख याच्यावर कारवाईची त्यांनी मागणी केली. पोलिस प्रशासनाला कारवाईत संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे देखील विखे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.