Vikhe Vs Thorat : जयश्री थोरात, खासदार वाकचौरे यांच्यासह 50 जणांवर गुन्हे...

A case has been filed by the Sangamner police in connection with the violence : संगमनेरच्या धांदरफळ इथं भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेनंतर झालेल्या हिंसाचारात पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आहे.
Vikhe Vs Thorat 1
Vikhe Vs Thorat 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : संगमनेरमधील हिंसाचारप्रकरण विरोधकांच्याच जास्त अंगलट आलं आहे. संगमनेर पोलिस ठाण्यात आंदोलन आणि सभा घेतल्याप्रकरणी विरोधकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात, शिवसेनाUBT पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रभावती घोगरे, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात, शरयू थोरात यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांची संगमनेरमधील धांदरफळच्या सभेनंतर हिंसाचार उफळला. या सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते संगमनेर पोलिस ठाण्यात जमा झाले होते.

Vikhe Vs Thorat 1
Radhakrishna Vikhe : संगमनेरच्या हिंसाचारावर मंत्री विखेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले 'षडयंत्र अन्..'

विधानसभा निवडणूक सुरू असल्याने आचारसंहिता सुरू आहे. कोणतीही पूर्वपरवानगी शिवाय संगमनेर पोलिस (Police) ठाण्यात आंदोलन केले. याशिवाय सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्या प्रतिमेला असंविधानिक शब्दांचा वापर करत जोडो मारो आंदोलन केले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. सुधिर तांबे, उत्कषा रुपवते, इंद्रजित थोरात, शरयु थोरात, सुरेश थोरात, प्रभावती घोगरे, करण ससाणे, बाबा ओहळ यांच्यासह 50 जणांवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Vikhe Vs Thorat 1
Congress Candidate List : आमदार कानडेंच्या मुंबईत गाठीभेटीवर भर; म्हणाले, 'प्रामाणिकपणाचा काँग्रेसकडून विश्वासघात'

यांच्याविरुद्ध दाखल झालाय गुन्हा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विश्‍वास मुर्तडक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या शरयु थोरात, सुरेश थोरात, राहाता विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे (रा. लोणी), सचिन बडगुजर (रा. श्रीरामपूर), बाबा ओहोळ (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), सीताराम राऊत (रा. संगमनेर),वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, बाळासाहेब गायकवाड (रा. आश्‍वी), हेमंत उगले (रा. श्रीरामपूर), करण ससाणे (रा. श्रीरामपूर), दिपाली करण ससाणे (रा. श्रीरामपूर), अमर कतारी (संगमनेर), अशोक सातपुते (रा. खांजापूर), माधवराव कानवडे (रा. संगमनेर), सचिन खेमनर, इंद्रजित खेमनर (रा. साकूर), राजाभाऊ खरात (रा. घुलेवाडी), सचिन चौघुले (रा. शिर्डी), सचिन दिघे (रा. तळेगाव) आणि यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com