Ahilyanagar mayor election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar mayor election : अहिल्यानगरवर अजितदादांचा झेंडा! महापौर राष्ट्रवादीचा; युतीत आतल्या गोटात डील पक्की, फॉर्म्युला काय?

Ahilyanagar Mayor: Jyoti Gade & Dhananjay Jadhav Selected After Vikhe-Jagtap Meeting : अहिल्यानगर महापालिकेत महापौर-उपमहापौपदाच्या वाटपाचा फाॅर्म्युला ठरला असून, पुढील पाच वर्षे प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे भाजप-राष्ट्रवादी युतीला संधी असणार आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar municipal corporation politics : अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदावर कोण बसणार, याबाबत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीत निश्चित झालं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी, राष्ट्रवादीकडून महापौरपदावर ज्योती गाडे यांना संधी देताना, सोयरे-धायऱ्यांचा राजकारण साधलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत सर्वेसर्वा अजित पवार आणि भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यातून अनोखी श्रद्धांजली वाहिली. भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. भाजपकडून युवा चेहरा धनंजय जाधव यांना उपमहापौरपदावर संधी दिली. याशिवाय पुढील पाच वर्षे, सव्वा-सव्वा वर्षांचा भाजप-अजित पवार राष्ट्रवादी युतीत, महापौर-उपमहापौरपदाचा फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं

अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर पदासाठी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून नगरसेविका ज्योती गाडे आणि भाजपकडून उपमहापौर पदासाठी नगरसेवक धनंजय जाधव यांनी महापालिकेचे नगरसचिव मेहेर लहारे यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज आज दुपारी दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह दोन्ही बाजूचे नगरसेवक उपस्थित होते.

महापौर ज्योती गाडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून गणेश भोसले यांनी, तर अनुमोदक म्हणून अविनाश घुले यांनी स्वाक्षरी केली. उपमहापौर धनंजय जाधव यांच्या अर्जावर सूचक म्हणून बाबासाहेब वाकळे व अनुमोदक म्हणून निखील वारे यांनी स्वाक्षरी केली आहे. महापौर-उपमहापौर पदाची निवड ही, सहा फेब्रुवारीला होणार असून, त्यावेळी या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

शिंदेंचा ठाणे पॅटर्न अहिल्यानगर...

अहिल्यानगरमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे महापालिकेतील पॅटर्न राबवण्याचं ठरवण्यात आलं. सव्वा-सव्वा वर्षे पदावर, दोन्ही युतींना संधी या पॅटर्ननुसार मिळणार आहे. अहिल्यानगरमध्येही पहिल्या सव्वा वर्षासाठी महापौर पदासाठी गाडे, तर उपमहापौर पदासाठी जाधव यांना संधी दिली गेली आहे. पुढच्या सव्वा-सव्वा वर्षाचे नवे पदाधिकारी त्यावेळी ठरवले जाणार आहेत. मे 2027मध्ये ती नवी निवड होईल. त्यावेळी कोणाला संधी मिळेल याचे आडाखे आतापासूनच बांधले जाऊ लागले आहेत.

सत्ता वाटपावर विखे-जगताप चर्चा करणार

अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांची बैठकीत या पदांबरोबरच, मनपाच्या स्थायी समितीचे सभापतीपद, महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती, सभागृह नेता या पदांसह स्थायी व महिला-बालकल्याण या दोन्ही समित्यांच्या सदस्य नियुक्तीबाबत माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप निर्णय घेणार असल्याचं ठरलं आहे.

स्वीकृतवर एकमत होईना

दरम्यान, मनपात नियुक्त करावयाचे सहा स्वीकृत नगरसेवकही सव्वा-सव्वा वर्षाचे असतील, असे सूतोवाच विखे पाटील यांनी केले असले तरी त्याबाबत नंतर ठरवू, असे आमदार जगतापांनी स्पष्ट केल्याने त्याबाबतचा संभ्रम कायम आहे. तसेच सव्वा वर्षानंतर पुढचे महापौर-उपमहापौर कोण असतील याची उत्सुकता आतापासूनच व्यक्त होत आहे.

जगतापांनी सोधा राजकारण साधलं

राहुरीचे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या असलेल्या ज्योती गाडे, या सावेडीतील प्रभाग तीनमधील सर्वसाधारण महिला या राखीव जागेवर सुमारे साडेचार हजार मते मिळवून निवडून आल्या आहेत. ज्योती गाडे या नात्याने आमदार जगताप यांची मेहुणी देखील येते. माजी उपनगराध्यक्ष दिवंगत कृष्णा जाधव यांचे पुत्र धनंजय जाधव हे प्रभाग पाचमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेवर सुमारे साडेसात हजार मते मिळवून निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT