BJP Corruption Files : भाजपच्या भ्रष्टाचाराची फाइल उघडताच अजितदादांचा घातपात? संजय राऊतांचा थेट ‘लोया कनेक्शन’ बॉम्ब!

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवार यांच्या अपघाती निधनावर संसदेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut Targets BJP
Sanjay Raut Targets BJPSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Plane Crash Investigation : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर अन् संशय व्यक्त करणारे मुद्दे उपस्थित केले.

याचा मुद्यांचा संदर्भ घेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, भाजपच्या घोटाळ्याची फाइल, असल्याचा अजितदादांनी केलेला उल्लेख अन् त्यांचा विमान अपघाती मृत्यू! रहस्यमय रित्या मृत्यू झालेल्या 'जस्टीस लोया' प्रकरणाचा दाखल देत, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घातपात, असा प्रश्न उपस्थित करत अजितदादांच्या अपघाती निधनाचा मु्द्दा संसदेत नेणार असल्याचा इशारा दिला.

अजिप पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी, अजितदादांचा अपघात आहे की घातपात आहे, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. यावरून राज्याच्या राजकारणात काहूर माजलं आहे. या शंकावर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, "हे प्रकरण साधे नाही. अजित पवार मागे फिरले असते तर, भाजपची (BJP) दहशत मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे अन् मी ती उघड करेन. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितले आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली."

Sanjay Raut Targets BJP
Sindhudurg Candidate sale banner : 'झेडपी'त उमेदवारांचा बाजार भरला! 25 लाखांत सौदेबाजी, बॅनरबाजीने राजकारण तापलं

अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत, असे सांगत संजय राऊत यांनी, अजित पवार यांच्या विमान आपघातावर अनेक शंका उपस्थित केल्यात. 'जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर, पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? सगळे देह जाळून खाक झाले.

त्यांची ओळख पटवता येत नव्हती. मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का?' असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.

Sanjay Raut Targets BJP
Sunetra Pawar News: बापाचं छत्र हरवलेल्या चिमुकल्यांना सुनेत्रा पवार भेटणार; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच दौरा

अजितदादांनी भाजप अजेंड्यावर काम केलं नाही

अजित पवार यांनी कधीही भाजपच्या अजेंड्यावर काम केले नसल्याची खासदार राऊत यांनी सांगून, 'सत्तेसाठी ते एकत्र आले. त्यांच्यावर भाजपने काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप केले. चौकशी लावल्या.

त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भाजपला सरेंडर झाले. आपल्या वरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.'

अजितदादांचा पक्ष भाजपने गिळला...

अजितदादांचा राष्ट्रवादीचा पक्षाच्या अध्यक्षपदावरून, संजय राऊत यांनी, 'पक्ष हा आता पवार, पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शहा, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहरांचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शहांचा पक्ष होता. आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भाजपने गिळून टाकला आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com