Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना ही नैसर्गिक युती नेहमची अनुभवायला मिळत होती. परंतु 2019च्या महायुती आणि आघाडीच्या राजकारणानंतर, अन् पुढं शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर, राज्यात स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या युती समोर आल्या.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत, एकनाथ शिंदे शिवसेनेला बाजू सारत, अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपची युती केली. या युतीने स्पष्ट बहुमत मिळावलं. विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच, महापौर, उपमहापौर अन् महापालिकेतील सत्ता वाटपाच्या गणितांवर चर्चा सुरू झाली आहे.
अहिल्यानगरच्या अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपच्या पहिल्या युतीत, महापौर अन् उपमहापौर कोण होणार? याची फैसला कोण घेणार? महापौर पद युतीमध्ये कोणत्या पक्षाला जाणार? याची चर्चा सुरू झाली आहे. या युतीचे शिल्पकार अन् नेतृत्व करणारे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील अन् राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) याचा फैसला करतील, असे सांगितलं जात आहे.
महापौर अन् उपमहापौर पदाच्या आरक्षणाची अजून सोडत झालेली नाही. निवडीचा कार्यक्रम अजून जाहीर व्हायचा आहे. तत्पूर्वी निकालाच्या विजयाची उत्सुकता युतीमध्ये शिगेला पोहोचली आहे. भाजपने (BJP) 25, तर अजित पवार राष्ट्रवादीने 27 जागा, अशा एकूण 52 जागांवर या युतीनं विजय मिळवला आहे.
या युतीने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवल्याने, महापौर अन् उपमहापौर अन् महापालिकेतील सत्ता वाटप कसं होणार याकडे निर्णय राहणार आहे. महापौर पदावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा की, भाजपचा उमेदवार विराजमान होतो, याकडे नगरकरांचे लक्ष असणार आहे.
सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांनी या निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं. महापौरपदावर कोण विराजमान होणार, कोणाला संधी देणार, हे दोघेच निर्णय घेतली, असे सांगितले जाते. पण, महापौर पदावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. यासाठी केडगाव इथं सुजय विखे पाटील यांनी प्रचारसभेत संग्राम जगताप यांच्यासमोर केलेल्या जोरदार भाषणाचा संदर्भ दिला जात आहे.
सुजय विखे पाटील यांनी, केडगाव बायपासजवळ 500 एकरमध्ये पुढील दोन वर्षांत एमआयडीसी आणणार असल्याचे सांगताना, शहर संभाळताना, छोट्या-मोठ्या कामांकडे लक्ष द्यायचे, अन् मोठे राज्य अन् केंद्राशी निगडीत काम माझ्याकडे सोपवावं, असं विधान केलं होतं. त्या विधानाचा अजित पवार राष्ट्रवादी आणि आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते विश्लेषण करण्यात गुंतले आहे.
युतीचा या विजय साजरा करताना संग्राम जगताप यांनी मोठा कस लावला, असेही कार्यकर्ते म्हणून लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ऐनवेळी सभा रद्द झाली. त्यानंतरही संग्राम जगताप यांनी गडाचं नियोजन करत, सांभळला. तुलनेत भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. या सभेला देखील संग्राम जगातप यांनी शहरातून जोरदार ताकद लावली होती.
युतीच्या विजयानंतर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटील पिता-पुत्राला संपर्क साधून अभिनंदन केलं. यानंतर विखे पाटील अन् जगतापांनी गुलाल उधळत विजयाची जल्लोष साजरा केला.
अहिल्यानगर महापालिकेसाठी एकुण 68 जागा होत्या. यात भाजप 25, शिवसेना 10, अजित पवार राष्ट्रवादी 27, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष 01, काँग्रेस 02, बहुजन समाजवादी पक्ष 01,AIMIM 02 जागांवर यश मिळवलं. राज ठाकरे यांच्या मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला खातं देखील उघडता आलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.