

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून, यात एकनाथ शिंदे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.
यात सर्वाधिक लक्षवेधी लढत जी होती, त्या प्रभाग क्रमांक 15च्या निवडणुकीचे सर्वाधिक लक्ष लागलं होतं, तिथं देखील एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि वरिष्ठ माजी नगरसेवक अनिल शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तिथं भाजपचे नवखे उमेदवार सुजय मोहिते हे विजय झाले आहेत.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15मध्ये भाजपविरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना अशी थेट लढत होती. हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, या बालेकिल्ल्या भाजप-अजित पवार राष्ट्रवादीने सुरूंग लावला आहे. नवख्या आणि जुन्यांचा मेळ घालत इथं भाजप-अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.
भाजप-अजित पवार राष्ट्रवादीची (NCP) युती झाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेला बाजूला सारलं. यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. पक्षाकडून 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. यात सर्वाधिक लक्षवेधी लढत, या प्रभाग 15 मध्ये होती. एकनाथ शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा वरिष्ठ माजी नगरसेवक अनिल शिंदे यांचा हा प्रभाग ओळखला जातो. तिथं एकतर्फा विजय वाटत होता. पण निकालाच्या दिवशी बाजी पटल्याचे दिसले.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, प्रियंका गायकवाड आणि विद्या खैरे यांच्याविरोधात भाजपचे पौर्णिमा गव्हाळे, दत्ता गाडळकर, गीतांजली काळे, सुजय मोहिते यांच्यात थेट लढत होती. यात भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. यात शिंदे-मोहिते यांच्या लढतीकडे लक्ष लागलं होतं. यात सुरवातीला शिंदे यांचे पारडं जड वाटत होतं. परंतु निकालात मोहिते यांनी बाजी मारली.
दरम्यान, अनिल शिंदे यांच्या घरावर निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांचा संयुक्त छापा पडला. हवाल्याचे पैसे आल्याचा संशयावरून हा छापा घालण्यात आला होता. यानंतर अनिल शिंदे यांची प्रकृती खालवली अन् त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले. अनिल शिंदे यांच्या पत्नी माजी महापौर शीला शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत, थेट आमदार अन् 'खासदार' यांना सुनावलं होतं. अनिल शिंदे अजूनही रुग्णालयात आहेत.
यानंतर सुवर्णा जाधव आणि दत्ता गाडळकर या काका-पुतणीमध्ये याच प्रभागात सरळ लढत होती. मतदानाच्या दोन दिवस अगोदर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. धारदार शस्त्रांचा वापर झाला. यात सात ते आठ जण जखमी झाले. जखमी अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर सुमारे 24 जणांसह इतरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागले होते. यात दत्ता गाडळकर यांनी मुसंडी मारली.
अनिल शिंदे यांच्यासह एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलला धक्का बसला आहे. तसाच, संपूर्ण अहिल्यानगर शहरात एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.