AIMIM performance Ahilyanagar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

AIMIM performance Ahilyanagar : 'AIMIM'चा धडाका! काँग्रेस-ठाकरेंनी लाज राखली, पवारांची एनसीपी पूर्णपणे कोसळली

Ahilyanagar Municipal Election: AIMIM, Congress Outperform Shiv Sena UBT and Sharad Pawar NCP MNS : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत AIMIMने खातं खोललं असून, तुलनेत ताकदवान असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला खातंही खोलता आलं नाही.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिकेत 'AIMIM'ने एन्ट्री घेतली आहे. या निवडणुकीत त्यांचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. तुलनेत दिग्गज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला आणि राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा मिळवता आली नाही.

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला एक, तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षाने कशीबशी निवडणुकीत लाज राखली आहे. परंतु 'AIMIM'च्या एन्ट्रीने अहिल्यानगर शहरातील राजकारणाला आगामी काळात वेगळं वळण मिळणार असल्याचं चित्र आहे.

मुंकुदनगर हा बहुमुस्लिम भाग आहे. इथं हिंदुत्वावादी पक्ष असलेल्या भाजप, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने उमेदवार दिले नव्हते. इथं 'AIMIM' आणि काँग्रेसमध्ये लढत होती. या लढतीत 'AIMIM' चारही जागांवर बाजी मारेल असेल दिसत होते. परंतु, काँग्रेसने इथं दोन जागा मिळवत, 'AIMIM'ला रोखलेलं दिसतं.

काँग्रेस (Congress) या निवडणुकीत खातंच खोलणार नाही, असे एक्टित पोल सांगत होते. परंतु बहु मुस्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरमध्ये 'AIMIM' विरोधात लढताना काँग्रेसचे बाबा खान आणि शम्स खान हे विजयी झाले आहे. अन्य दोन जागांवर 'AIMIM' शहेबाज सय्यद अली आणि मीनाज खालीद शेख हे विजयी झाले आहेत.

'AIMIM'ने अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सहा उमेदवार दिले होते. या उमेदवारांसाठी 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दोन सभा घेतल्या. त्याचा फायदा झालेला दिसतो आहे. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य खासदार इम्रान प्रतापगढी यांनी देखील सभा घेऊन चांगली वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे बहु मुस्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. काँग्रेसने 10 एवढ्या जागा लढवल्या होत्या. यात पाच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढल्या.

या निवडणुकीत आणखी एक राजकीय धक्कादायक चित्र समोर येताना दिसत आहे. शिवसेना फुटाची फटका सर्वाधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला झालेला दिसतो. त्याखालोखाल एकनाथ शिंदे शिवसेनेला देखील याचा फटका बसला. या दोन्ही शिवसेनेला नेतृत्व नसल्याचा फटका बसला. परिणामी सत्तेतून बाहेर फेकले गेले.

शिवसेना ठाकरे गटाला एकच जागा, योगीराज गाडे यांच्या रूपाने मिळाली. त्यांनी कशीबशी शिवसेना ठाकरे पक्षाची लाज राखली. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे सेना पक्षाने 21 जागावर लढली होती. याशिवाय अहिल्यानगरवर शरद पवार यांचे विशेष प्रेम दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला ही निवडणूक महत्त्वाची होती. खासदार नीलेश लंके आणि शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर या महाविकास आघाडीकडून निवडणुकीचे नेतृत्व करत होते.

असे असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकीत 29 जागा लढवून एकाही जागेवर यश मिळवता आलेले नाही. तसंच मनसेने सहा जागा लढवून एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे 'AIMIM' पवारांच्या राष्ट्रवादीला अन् मनसेला भारी भरली, असे विश्लेषण होऊ लागले आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची अहिल्यानगर शहरातील राजकीय अस्तित्वासाठी कशी वाटचाल असेल याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT