Ahilyanagar Municipal Election Result : अहिल्यानगर महापालिकेत 67 जागांसाठी झालेल्या निवडणुवकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आणली. अजित पवार राष्ट्रवादी सर्वाधिक 27 जागा मिळवून मोठा पक्ष ठरला. त्या खालोखाल भाजपला 25 जागा मिळाल्या. एकनाथ शिंदे शिवसेनेला युतीतून बाहेर ढकलण्यात आलं होतं. त्यांनी स्वबळावर लढवत दहा जागांवर विजय मिळवला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, बहुजन समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. AIMIM अन् काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसेला भोपळा फोडता आला नाही.
विजय उमेदवारांची प्रभागनिहाय यादी पुढीलप्रमाणे देत आहोत. पण भाजप-अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सत्तेत महापौर आणि उपमहापौर अन् सत्ता वाटपाचं गणित कसं असणार, विरोधी पक्षनेता कोण होणार, याची चर्चा अहिल्यानगर शहरात रंगली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर अन् उपमहापौर पदावर दावा सांगण्यात सुरवात झाली आहे.
प्रभाग क्रमांक एकमध्ये : सागर बोरुडे (अजित पवार राष्ट्रवादी), दीपाली बारस्कर, संपत बारस्कर (अजित पवार राष्ट्रवादी), शारदा ढवण (भाजप) (BJP).
प्रभाग क्रमांक दोनमध्ये : निखील वारे (भाजप), रोशनी त्र्यंबके (भाजप), बाळासाहेब पवार (अजित पवार राष्ट्रवादी), महेश तवले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक तीनमध्ये : योगीराज गाडे (शिवसेना ठाकरे पक्ष), गौरी बोरकर (अजित पवार राष्ट्रवादी), ज्योती गाडे (अजित पवार राष्ट्रवादी), ऋग्वेद गंधे (भाजप)
प्रभाग क्रमांक चारमध्ये : खान मीनाज (काँग्रेस), शम्स खान (काँग्रेस), शहेबाज शेख (एमआयएम), सय्यद शहाबाज (एमआयएम)
प्रभाग क्रमांक पाचमध्ये : धनंजय जाधव (भाजप), हरप्रीतकौर गंभीर (अजित पवार राष्ट्रवादी), मोहीत पंजाबी (अजित पवार राष्ट्रवादी), काजल भोसले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक सहामध्ये : मनोज दुल्लम (भाजप), सोनाबाई शिंदे (भाजप-बिनविरोध), करण कराळे (भाजप-बिनविरोध) आणि सुनीता कुलकर्णी (भाजप)
प्रभाग क्रमांक सातमध्ये : पुष्पा बोरुडे (भाजप, बिनविरोध), बाबासाहेब वाकळे (भाजप), वंदना साठे (भाजप), वर्षा सानप (भाजप)
प्रभाग क्रमांक आठमध्ये : कुमारसिंह वाकळे (अजित पवार राष्ट्रवादी-बिनविरोध), सुनीता भिंगारदिवे (अजित पवार राष्ट्रवादी), नवनाथ कातोरे (धनुष्य बाण), आशा कातोरे (भाजप)
प्रभाग क्रमांक नऊमध्ये : संजय शेंडगे (धनुष्य बाण), रुपाली दातरंगे (धनुष्य बाण), वैशाली नळकांडे (धनुष्य बाण), महेश लोंढे (भाजप)
प्रभाग क्रमांक 10 मध्ये : श्रीपाद छिंदम (बसपा), सागर मुर्तडकर (भाजप), मुयरी जाधव (भाजप), शीतल ढोणे (भाजप)
प्रभाग क्रमांक 11 मध्ये : गणेश कवडे (धनुष्यबाण), सुनीता गेनप्पा (धनुष्यबाण), आशा डागवाले (अजित पवार राष्ट्रवादी) आणि सुभाष लोंढे (भाजप)
प्रभाग क्रमांक 12 मध्ये : चंद्रशेखर उर्फ बाळासाहेब बोराटे (धनुष्यबाण), दत्ता कावरे (धनुष्यबाण), मंगल लोखंडे (धनुष्यबाण), सुरेखा कदम (धनुष्यबाण)
प्रभाग क्रमांक 13 मध्ये : अविनाश घुले (अजित पवार राष्ट्रवादी), सुरेश बनसोडे (अजित पवार राष्ट्रवादी), सुजाता पडोळे (अजित पवार राष्ट्रवादी) आणि अनिता शेटिया (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 14 मध्ये : प्रकाश भागानगरे (अजित पवार राष्ट्रवादी- बिनविरोध), सुनीता फुलसौंदर (अजित पवार राष्ट्रवादी), मीना चोपडा (अजित पवार राष्ट्रवादी) आणि गणेश भोसले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 15 मध्ये : सुजय मोहिते (भाजप), दत्ता गाडळकर (भाजप), गीतांजली काळे (अजित पवार राष्ट्रवादी), पौर्णिमा गव्हाळे (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 16 मध्ये : अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले (भाजप), विजय पठारे (भाजप), सुनीता कांबळे (अजित पवार राष्ट्रवादी) व वर्षा काकडे (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 17 मध्ये : मनोज कोतकर (भाजप), कमल कोतकर (भाजप), अश्विनी लोंढे (अजित पवार राष्ट्रवादी) आणि मयूर बांगरे (अजित पवार राष्ट्रवादी).
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.