Election 32 New Councillors : अहिल्यानगरमध्ये इतिहास रचला! दोन माजी महापौर– तीन उपमहापौर परतले, 32 चेहऱ्यांचा पहिल्यांदाच विजय

Ahilyanagar Election Result : 32 New Councillors, Two Former Mayors & Three Deputy Mayors Elected : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून, सभागृहात पहिल्यांदा 32 नवे चेहरे दिसणार आहे.
Ahilyanagar Election Result
Ahilyanagar Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election Results : अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीचा स्पष्ट झाला असून, पहिल्यादांच 32 नवीन चेहरे निवडून आले आहेत. हा एक इतिहास घडला असून, त्याची राज्यात चर्चा आहे.

तसंच दोन महापौर अन् तीन उपमहापौर, माजी महापौरचा पती, दोन विरोधी पक्षनेत्यांसह दिग्गज 12 नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात पुन्हा 'कमबॅक' केलं आहे.

माजी महापौरमध्ये बाबासाहेब वाकळे आणि सुरेखा कदम विजयी झाले आहेत. तर माजी उपमहापौरमध्ये श्रीपाद छिंदम, गीतांजली काळे, गणेश भोसले हे तिघे विजयी झाले आहे. नवव्यांदा नगरसेवक झालेले एकनाथ शिंदे शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, अजित पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, भाजपचे (BJP) निखील वारे, धनंजय जाधव, दीपाली बारस्कर आदी प्रमुख उमेदवार विजयी झाले.

गेल्यावेळेस महापौर राहिलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे, तसंच महापालिका स्थापन झालेल्यानंतर शिवसेनेचे महापौर झालेले भगवान फुलसौंदर यांची पत्नी सुनीता फुलसौंदर पहिल्यादांच विजयी झाल्या आहेत.

Ahilyanagar Election Result
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : शिर्डीच्या 'दादा'समोर पवारसाहेबांच्या 'दादा'ला जमलंच नाही? अहिल्यानगरमध्ये 'तुतारी'ला कंठ फुटलाच नाही!

'AIMIM'चे नवीन चेहरे

या निवडणुकीत पहिल्यादांच नवीन 32 चेहरे निवडून आले आहेत. रोशनी त्रिंबके (अजितदादा राष्ट्रवादी), गौरी बोरकर (अजितदादा राष्ट्रवादी), ऋग्वेद गंधे (भाजप), शहेनाज शेख (AIMIM), शहाबाज सय्यद (AIMIM), मीनाज खान (काँग्रेस) व शम्स खान (काँग्रेस), काजल भोसले (अजितदादा राष्ट्रवादी), गंभीर हरप्रित कौर (अजितदादा राष्ट्रवादी), मोहीत पंजाबी (अजितदादा राष्ट्रवादी), सुनीता कुलकर्णी (भाजप), करण कराळे (भाजप), वर्षा सानप (भाजप), आशा कातोरे (भाजप), नवनाथ कातोरे (भाजप), रुपाली दातरंगे (शिंदे सेना), वैशाली नळकांडे (शिंदेसेना),

Ahilyanagar Election Result
AIMIM performance Ahilyanagar : 'AIMIM'चा धडाका! काँग्रेस-ठाकरेंनी लाज राखली, पवारांची एनसीपी पूर्णपणे कोसळली

लोंढे अन् मोहिते सर्वात युवक नगरसेवक

तसंच, मयुरी जाधव (भाजप), सागर मुर्तडकर (भाजप), शीतल ढोणे (भाजप), आशा डागवाले (अजितदादा राष्ट्रवादी), सुनीता गेनप्पा (शिंदेसेना), सुरेश बनसोडे (अजितदादा राष्ट्रवादी), सुजाता पडोळे (अजितदादा राष्ट्रवादी), अनिता शेटिया (अजितदादा राष्ट्रवादी), पौर्णिमा गव्हाळे (अजितदादा राष्ट्रवादी), दत्ता गाडळकर (भाजप), सुजय मोहिते (भाजप) वर्षा काकडे (अजितदादा राष्ट्रवादी), मयुर बांगरे (अजितदादा राष्ट्रवादी), अश्विनी लोंढे (अजितदादा राष्ट्रवादी) व कमल कोतकर (भाजप) यांचा समावेश आहे.

शेख ते सातपुतेपर्यंत प्रमुख पराभूत...

नगरपालिका व महापालिका मिळून तब्बल नऊ वेळा नगरसेवक झालेले व आता दहाव्यांदा यश मिळवून नगरसेवकपदाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची आशा बाळगणारे नज्जू पहेलवान उर्फ नजीर अहमद शेख पराभूत झाले. याशिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, एकनाथ शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी जाधव, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, भाजपचे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांच्या सूनबाई दीप्ती सुवेंद्र गांधी, एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते व माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते, समद खान, मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा जाधव यांचा प्रमुख पराभुतांमध्ये समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com