Nilesh Lanke On Sangram Jagtap controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke On Sangram Jagtap controversy : लंकेंनी जगतापांवर साधला निशाणा; सरकारी बाॅडीगार्डचा गैरवापर, भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा दिला इशारा

Ahilyanagar Municipal Election: Nilesh Lanke Slams Sangram Jagtap Over Threats tov Sharad Pawar NCP–MVA Candidates : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीनिमित्ताने मविआच्या प्रेसमध्ये खासदार नीलेश लंके यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दौऱ्यावर आले असताना, त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार नीलेश लंके यांनी निवडणुकीतील सत्ताधाऱ्यांच्या दहशतीवर निशाणा साधला.

खासदार लंके यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता, सरकारी बाॅडीगार्ड गैरवापर करणे, विरोधक उमेदवारांवर दहशत निर्माण करण्यासह महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, "प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंदुकीचा धाक दाखवून खोटे-नाटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुद्धा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका आमदाराच्या सरकारी बॉडीगार्डने, एका उमेदवाराच्या घरासमोर जाऊन दाखवून, त्याच्या घराबाहेर हातात गन घेऊन फिरला, दबाव तंत्राचा प्रकार केला. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली, त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले. असे प्रकार रोज या शहरांमध्ये चालू आहेत."

'अहिल्यानगर शहर हे सेक्युलर विचारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील, असा विश्वास आहे. गेली अनेक वर्षे अहिल्यानगर शहराकडे शांतता प्रिय शहर म्हणून पाहिलं जात होतं. परंतु मधल्या काळात या शहराला वेगळ्या विचारधारेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू झाला,' असे सांगून मधल्या काळात आमदार संग्राम जगतापांकडून (Sangram Jagtap) झालेल्या हिंदुत्वाच्या प्रयोगावर खासदार लंके यांनी नाव न घेता निशाणा साधला. मुकुंदनगरमधील काँग्रेस उमेदवारांविरोधात खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला, असा गोप्यस्फोट देखील खासदार लंके यांनी केला.

'महाविकास आघाडीकडे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत. धनदांडगे नाहीत. कोणत्याही मालमत्तेचे व्यवसाय करत नागहीत. चुकीचे व्यवसाय करणारे नाहीत. सामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत. महाविकास आघाडीला एक संधी द्या. या महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. महापालिकेमध्ये कुठलेही ऑडिट होत नाही. मनमानी कारभार चालतो. एखादा विरोधात गेला की, त्याचं अतिक्रमण काढायचं, चुकीच्या नोटीस पाठवायच्या, फेस टू सारख्या योजना प्रलंबित आहेत,' याकडे नीलेश लंके यांनी लक्ष वेधलं.

मुख्यमंत्र्यांच्या सभेवर निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेवर बोलताना नीलेश लंके म्हटले की, "महापालिकेतील भ्रष्टाचारावर मुख्यमंत्र्यांनी बोलणे अपेक्षित होते. पण त्यांनी विषय वेगळा ठिकाणी भरकटवला. त्यांना सत्ता हवी. यांना फक्त डोके मोजायचे आहेत. जाती-जातीमध्ये भांडण लावून ते आपले पोळी भाजत आहेत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT