Ahilyanagar Exit Poll Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Exit Poll : एक्झिट पोलचा बॉम्ब! अहिल्यानगर महापालिकेत शिंदेसेना सत्तेवर राहणार की विरोधात?

Ahilyanagar Exit Poll: Ajit Pawar NCP-BJP or Shinde Shiv Sena–MVA, Who Will Rule? राज्यातील महापालिका सत्ता कोणाची येणार, याचा सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीच्या सर्व्हेनुसार अहिल्यानगर महापालिकेत कोणाची सत्ता येणार याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Mahapalika Result Prediction : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 48.49 टक्के मतदान झालं. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. हा मतदानाचा आकडा 65 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान संपलं असल्याने 'एक्झिट पोल' समोर येऊ लागले आहे.

अहिल्यानगर महापालिकेचा देखील 'एक्झिट पोल' समोर आला आहे. सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. अहिल्यानगर महापालिकेत जवळपास भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीची सत्ता जवळपास निश्चित दिसते आहे.

मतदारांनी (Voter) दिलेला हा कौल मतपेटीत बंद झाला असून त्याची उद्या शुक्रवारी (16 जानेवारी) सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीवर महाराष्ट्रातील सर्वात अचून 'एक्झिट पोल' प्रसिद्ध झाला आहे. साम टीव्हीचा हा 'एक्झिट पोल'नुसार अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची युती सत्तेवर येताना दिसत आहे.

अहिल्यानगर महापालिका एक्झिट पोलनुसार, भाजपला 19, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेला 14, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 24, काँग्रेस दोन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला चार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला चार आणि बहुजन समाजवादी पक्षाला एक जागा मिळताना दिसत आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 68 जागांसाठी लढत झाली आहे. भाजप-अजित पवार राष्ट्रवादीची युतीने एकनाथ शिंदे शिवसेनेला बाजूला सारलं. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेने 54 जागांवर उमेदवार दिले. भाजप 32, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागा लढल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने 29, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने 21, मनसे सात, वंचित बहुजन आघाडी दोन, 'AIMIM'ने सहा, बहुजन समाज पक्ष पाच, एकलव्य पक्ष पाच आणि आम आदमी पक्षाने सहा जागा लढवल्या.

एक्झिट पोलनुसार अहिल्यानगर महापालिकेत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे एकत्रित संख्याबळानुसार 33 होऊन, सत्ता स्थापन करताना दिसत आहे. शिवसेना फुटाची फटका बसला आहे. शिवसेनेची सत्ता जात असून, एकनाथ शिंदे शिवसेनेला उद्धव ठाकरे शिवसेनेबरोबर विरोधात बसावे लागत असल्याचे चित्र आहे.

'AIMIM' खातं खोलताना दिसेना

'AIMIM'ने पहिल्यादाच सहा उमेदवार देत निवडणूक लढवली होती. या उमेदवारांच्या प्रचारासाठी 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दोन प्रचार सभा घेतल्या. परंतु एक्झिट पोलनुसार त्यांच्या वाट्याला एकही जागा जाताना दिसत नाही. बहुजन समाजवादी पक्ष गेल्या निवडणुकीत चार जागा घेतल्या होत्या, हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत एक जागा राखताना दिसत आहे.

काँग्रेसच्या जागा घटणार?

काँग्रेसच्या जागांमध्ये घट होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पाच जागा जिंकल्या होत्या. त्यात तीन घट होऊन दोन येताना दिसत आहे. समाजवादी पक्षाला गेल्यावेळी एक जागा होती, यावेळी त्यांना एकाही जागा दिसत नाही. आम आदमी पक्षाला एकही जागा मिळताना दिसत नसली, तरी मतदारांवर त्यांचा प्रभाव मतदानाच्या दिवशी दिसला.

भाजप-राष्ट्रवादी युती फळाला?

गेल्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळी तिला 18 जागांवर यश मिळालं होते. यावेळी अजित पवार राष्ट्रवादी भाजपबरोबर युती करून, देखील एक्झिट पोलनुसार 24 जागांवर विजय दाखवत आहे. म्हणजेच सहा जागांवर अधिक विजय मिळवेल, असा अंदाज आहे. भाजपला गेल्यावेळी 14 जागांवर विजय होता. त्यांच्या देखील पाच जागा वाढून, त्या 19 होतील, असा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT