Sujay Vikhe Pattern Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Lok Sabha pattern : ‘डमी’ने केला गेम? शिंदेंच्या शिलेदाराचा धुव्वा; विखेंचा लोकसभा फॉर्म्युला पुन्हा चर्चेत!

Ahilyanagar Municipal Election: Sujay Vikhe Uses Lok Sabha Pattern to Defeat Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांचे जिल्हाप्रमुख तथा ज्येष्ठ माजी नगरसेवक अनिल शिंदे यांच्या पाडण्यासाठी लोकसभेमधील विखे पॅटर्न राबवल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

Ahilyanagar Municipal Election : सुजय विखे पाटील आणि नीलेश लंके यांच्यात अहिल्यानगर लोकसभा निवडणूक देशपातळीवर गाजली. विखे पाटलांनी निवडणूक लढतात ते जिंकण्यासाठी! लोकसभेत, तशी ती लढली देखील. लंकेंना पराभूत करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केला.

'सेम टू सेम', नावाचा हा पॅटर्न त्यावेळी चांगलाच गाजला होता. पुढे हा पॅटर्न, अहिल्यानगर जिल्ह्यात 'विखे पॅटर्न' नावानं ओळखला जाऊ लागला. या पॅटर्नचा वापर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत झाला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शिलेदाराला रोखण्यासाठी हा पॅटर्नचा यशस्वी वापर झाल्याची चर्चा आहे.

अहिल्यानगर महापालिकेत सर्वाधिक लक्षवेधी लढत झाली, ती प्रभाग क्रमांक 15 मध्ये. या प्रभागात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनाविरुद्ध भाजप, अशी थेट लढत होती. एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा ज्येष्ठ माजी नगरसेवक अनिल शिंदे यांचा हा प्रभाग. गेल्या 20 ते 25 वर्षे त्यांची या प्रभागावर वर्चस्व आहे. हाच प्रभाग यावेळी 'विखे पॅटर्न'ने, सुजय मोहिते यांच्या स्वरूपात विजयी झाल्याची चर्चा रंगली आहे.

शिवसेनेचे अनिल शिंदे यांचा पराभव अवघ्या शेकड्याच्या मतात झाला आहे. भाजपचे (BJP) सुजय मोहिते 114 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे सुजय मोहिते यांना 5239, एकनाथ शिंदे शिवसेनेचे अनिल शिंदे 5125, वंचित बहुजन आघाडीचे फैरोज पठाण 481 आणि अपक्ष उमेदवार अनिल शिंदे यांना 220 मतं मिळाली आहे.

शिवसेनेचे अनिल शिंदे यांना रोखण्यासाठी, त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार प्रभागात होता. या उमेदवाराला 220 मतं आहेत. अनिल शिंदे यांचा पराभवाची मतांचा हिशोब पहिल्यास, अनिल शिंदेविरोधात सुजय मोहिते यांना 114 मतांचा लिड आहे. अपक्ष अनिल शिंदे उमेदवार नसता, तर अनिल शिंदे यांचा विजय निश्चित होता, असे गणित आता चर्चेत आहे.

शिवसेनेचे अनिल शिंदे यांना पाडण्यासाठी 'विखे पॅटर्न' राबवला गेला असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ दिला जात आहे. नीलेश लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती पारनेरमधूनच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप यांच्यात टोकाचं वाक् युद्ध रंगलं होतं.

लंके-विखे टीका

नीलेश लंकेंनी या विखे पॅटर्नवर ट्विट करत टीका केली होती. "सुजयजी मानले तुम्हाला, माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या डमी कारभारासारखाच.. परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो, पैशाच्या बळावर उमेदवार डमी उभा कराल ही.. पण मतदान रुपी जनता डमी तयार करता येत नाही एवढं लक्षात ठेवा. परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी" अशा शब्दात लंकेंनी विखे पाटलांवर टीका केली होती.

शिंदेसेनेला गाफिलपणा भोवला

महापालिका निवडणुकीत मात्र, एकनाथ शिंदे शिवसेना 'विखे पॅटर्न'बाबत गाफील राहिली. विशेष म्हणजे, हा पॅटर्न इतर कोठेच दिसत नाही, याकडे देखील स्थानिक राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. यातच अनिल शिंदे यांना चौहू बाजूने घेरलं गेलं होतं. हवालाची रक्कम आल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापा घातला. यानंतर अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, ती बिघडली. सध्या त्यांच्या पुणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT