

Mumbai Municipal Election 2026 : मुंबई मतदानावेळी मतदारांच्या बोटावर निवडणूक आयोग लावत असलेली शाई पुसली जात असल्याचा प्रकाराने खळबळ उडली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
तोच निवडणूक आयोगाने घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन शाई पुसत जात नसल्याचा दावा केला. परंतु मुंबईतील मतदानाची शाई पुसण्याच्या या प्रकारावरून देशभर खळबळ उडाली. कनार्टक राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावरून भाजपच्या मतचोरीवर निशाणा साधला.
मुंबई महापालिका (BMC Election) निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बोटांवर लावलेली अमीट शाई ही सॅनिटायझर, एसीटोन आणि इतर रसायकीय द्रव्याने सहजपणे काढता येत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे निवडणुकीच्या सुरक्षिततेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी चिंता व्यक्त करणारी प्रतिक्रिया कर्नाटक राज्याचे काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.
'प्रत्येक मत पवित्र असेल, तरच लोकशाही टिकू शकते. निवडणूक प्रक्रियेची सुरक्षितता आणि विश्वासार्हता धोक्यात येऊ नये. ही केवळ एक चूक नाही, तर ‘मतचोरी’चा आणखी एक अध्याय आहे,' असे सांगत सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी ‘एक्स’वर पोस्टद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली.
सिद्धरामय्या म्हणाले, "अशा प्रकारांमुळे लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होईल. मूलभूत सुरक्षा उपाय कमकुवत करून आणि नागरिकांच्या चिंता दुर्लक्षित करून लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही." त्यामुळे निवडणूक आयोगाने पारदर्शकता, जबाबदारी आणि सुधारात्मक उपाययोजनांसह तातडीने पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ‘मतचोरी’च्या विरोधात देशभर मोहीम सुरू केली असून केंद्रातील भाजप सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मिळालेल्या विजयाचे कर्नाटक भाजप नेत्यांनी स्वागत केले. यावर्षी होणाऱ्या कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही असाच जनादेश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सांगितले की, हा निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनीही हा कौल विकासाभिमुख आणि निर्णायक नेतृत्वाला मिळालेले समर्थन असल्याचे म्हटले असून येणाऱ्या बृहन् बंगळूर प्राधिकरण (जीबीए) निवडणुकीत बंगळूरचे मतदार भाजपला संधी देतील, असा विश्वास व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.