Ahilyanagar municipal election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत वेगळं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीत तिसरा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून समन्वय साधला जात नाही, असा तक्रारीचा सूर भाजपचे माजी खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी अळवलाय.
या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात युती होईल, अशा चर्चेनं जोर धरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडी-युतीचा निर्णय घेण्याचे अधिकारी स्थानिक पातळीवर दिले आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकारी महायुतीत सन्मानाची अपेक्षा ठेवून आहेत. यातून काही वेगळाच चमत्कार घडण्याची शक्यतेच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, "ठाकरे-शिंदे शिवसेना अहिल्यानगरमध्ये एकत्र येईल, ही फक्त अफवा आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समन्वय दिसतो आहे. परंतु तिसरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत संभ्रमावस्था आहे. महायुतीमधील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शिवसेना पक्ष काहीसा दूर आहे. कारणे देखील तशीच आहेत. ही परिस्थिती अहिल्यानगर महापालिकापुरती नसून, जिल्ह्यातील बारा नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्येही तशीच आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे (BJP) उमेदवार सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला, तर विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा विजय झाला. विखे पाटील आणि जगताप यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष सक्रिय राहिला. तसं पहिल्यास महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेचं राहिलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील बहुतांशी माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली. काही जण थांबा आणि पाहा, अशी भूमिका घेत आता भाजपच्या वाटेवर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात सहभागी झालेल्या माजी नगरसेवकांशी महायुतीत काहीसा विसंवाद दिसतो आहे.
अहिल्यानगर शहरातील विखे पाटील आणि जगताप यांच्या कार्यक्रमांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना सहभागी होताना दिसत नाही. अपवादात्मक कार्यक्रमात बरोबर असले, तरी विसंवाद कायम आहे. हीच परिस्थिती राहिल्यास अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल, अशी चर्चेनं शहरात जोर धरला आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे.
या चर्चेत, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार संग्राम जगताप समन्वयाने काम करतो. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा संपर्क होत नाही. त्यांचाही माझ्याशी संपर्क नाही. विखे पाटील यांचे हे विधान बरच काही सांगून जाते. यातच, अहिल्यानगर शहरात वेगळा प्रयोगाची चर्चा सुरू आहे.
खासदार नीलेश लंके यांनी विकास आघाडीचा प्रयोगाचं भाष्य केलं आहे. त्यानुसार काही बैठका देखील झाल्या आहेत. दोन्ही शिवसेनेचा कट्टर प्रतिस्पर्धी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार संग्राम जगताप आहे. त्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सन्मान न झाल्यास, दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास वावग ठरणार नाही, शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळून देखील आमदार संग्राम जगताप यांनी भाजप-बसपा-राष्ट्रवादी यांना एकत्र करत भाजपचा महापौर केला होता.
महाविकास आघाडीची शहरात ताकद नाही, असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने आपापली फिल्डिंग लावून आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष काय भूमिका घेतो, यावर 'मविआ'चे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसने जुन्या पदाधिकाऱ्यांना बळ दिलं असून, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी जुन्या-नव्यांची सांगड घालून तयारी चालवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने देखील दादा कळमकर आणि अभिषेक कळमकर, या काका-पुतण्यांकडे पक्षाची जबाबदारी देत, तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत बराच राजकीय धुरळा उडणार असून, बेरजेच्या राजकारण जो करेल, त्याचा फायदा होईल, असे चित्र निर्माण झालं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे म्हणाले, "अहिल्यानगर महापालिकेत शिवसेना मोठा पक्ष राहिला आहे. आम्ही या सर्व जागा लढवणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार कार्यवाही होईल. पण महापालिकेत शिवसेना ठाकरे सेना पक्षाचाच भगवा फडकेल."
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, "महायुतीत शिवसेनेकडून समन्वयासाठी अनिल शिंदे, मी स्वतः आणि गणेश कवडे, आम्ही बोलत आहोत. ठाकरे-शिंदे शिवसेना अहिल्यानगरमध्ये एकत्र येईल, ही फक्त अफवा आहे. तसा कोणताच विषय नाही. झाल तर महायुतीत लढू. महायुतीत आम्हाला सन्मानानं जागा दिल्या, तर महायुतीबरोबर शंभर टक्के लढू. सन्मानानं जागा मिळाल्या नाही, तर स्वतंत्र लढू. पण कोणासोबतही युती करणार नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.