Mukundnagar renaming demand Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mukundnagar demand : पुन्हा नामांतराचा मुद्दा तापणार; अहिल्यानगर नाव करताना जनमतानाचा अनादर, युवक काँग्रेसचा गंभीर आरोप

Youth Congress Demands Renaming Mukundnagar in Ahilyanagar : युवक काँग्रेसने अहिल्यानगर महापालिकेकडे मुकुंदनगरचे शाह शरीफनगर नामांतर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar news : अहिल्यानगरमध्ये ऐन थंडीत पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा पेटणार असल्याची चिन्हं आहे. युवक काँग्रेसने बहु मु्स्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरचे 'शाह शरीफनगर' नामांतर करण्याची मागणी केली आहे.

अहिल्यानगर महापालिकेला यासंदर्भात निवेदन दिलं आहे. अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर करताना, जनमताचा अनादर करण्यात आल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसने यावेळी केला.

युवक काँग्रेसचे (Congress) मोसीन शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अहिल्यानगर महापालिकेला निवेदन दिले. यात मुकुंदनगर हा बहु मुस्लिम भाग आहे. या भागात मुस्लिमांची जवळपास सुमारे 50 हजारांवर लोकसंख्या आहे. तसंच संपूर्ण अहिल्यानगर शहरात दोन लाखांवर मुस्लिमांची संख्या आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

राज्य सरकारने अहमदनगरचे जिल्ह्याचे अहिल्यानगर असं नामांतर केलं. यात शहराचा देखील समावेश केला. जनभावनेमुळे नामांतर करण्यात आल्याचं स्पष्टीकरण सरकार देत आहे. परंतु हे नामांतर करताना, कोणत्याही जनभावनेचा आदर करण्यात आलेला नाही. विशेष करून मुस्लिमांच्या (Muslim) भावनांचा कुठेही आदर झालेला नाही. आता अहिल्यानगर शहरातील बहु मुस्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरचे 'शाह शरीफनगर' नामांतर करण्याची मागणी युथ काँग्रेसने केली आहे.

राज्यतील अनेक शहर, जिल्ह्यांचे नामांतर होत आहे. विशेष करून मुस्लिम संदर्भ असलेल्या नावं बदलली जात आहेत. ही नाव बदलताना मुस्लिमांच्या भावनांची कुठलाही विचार केला जात नाही. मात्र अशा स्वरूपाची मागणी करण्याचा अधिकार संविधानाने देखील मुस्लिमांना दिला आहे, याकडे युथ काँग्रेसचे मोसीन शेख यांनी लक्ष वेधले.

ऐतिहासिक दाखला

शाहशरीफ नावाला ऐतिहासिक दाखला आहे. घुमटच्या टोकावर तळपता सूर्य असणारा दर्गा म्हणून शाहशरीफ दर्गा ओळखला जातो. मुकुंदनगरमध्ये हा दर्गा आहे. तिथं शाहशरीफजी जलाली होते. शाहशरीफजी जे बोले ते खरे होई. त्यामुळे मुस्लिमांबरोबर इतर समाजात देखील त्यांच्याविषयी आदर होता. त्यामुळे मुस्लिमांच्या भावनांचा आदर करून, मुकुंदनगरचे नाव त्यांच्या नावाने म्हणजे, शाह शरीफनगर करावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

युथ काँग्रेसनं राजकीय वातावरण तापवलं

दरम्यान, अहिल्यानगरचे नामांतर झाल्यानंतर, त्यातून वैचारिक संघटनांनी त्यावरून न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण तापलं आहे. पुढं अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. यातच युथ काँग्रेसने अहिल्यानगर शहरातील बहु मुस्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरच्या नामांतराचा मुद्दा हाती घेतला आहे.

'AIMIM' ताकद वाढवत असलेला भाग

यातच या भागात गेल्या काही दिवसांपासून 'AIMIM' आपली ताकद वाढवत आहे. 'AIMIM'चे सर्वेसर्वा असदुद्दीने ओवैसी, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या भागात सभा घेऊन महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. याच भागाचा नामांतराचा मुद्दा युथ काँग्रेसने उचलून धरला आहे. निवडणुकीच्या तोंडावर युथ काँग्रेसला हा मुद्दा कितपत फायद्याचा ठरणार याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT