

Sanjay Raut jail statement : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत आजारपणाच्या दोन महिन्यानंतर पहिल्यांदा मुंबईत माध्यमांसमोर आले.
माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी आपलं आजारपण हे तुरुंगात गेल्यापासून सुरू झालं. हे आजारपण तुरुंगातलं आहे. सरकारला चांगले वाटते की, विरोधक हे तुरुंगात असले पाहिजे, अशी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
अंमलबजावणी संचालनालय अर्थातच, ईडी या आर्थिक गुन्हे विषयक तपास करणाऱ्या केंद्रीय विभागाच्या यंत्रणेने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक केली. संजय राऊत तब्बल 101 दिवस तुरुंगात होते. त्यात त्यांना न्यायालयाने जामीन दिला. तुरुंगात असताना संजय राऊत यांनी तुरुंगातील 101 दिवसांच्या अनुभवावर 'नरकातला स्वर्ग' पुस्तक लिहिलं. या पुस्तकात अनेक खळबळजनक दावे आहेत.
शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची मैदानी तोफ म्हणून खासदार संजय राऊतांकडे पाहिले जाते. रोज सकाळी माध्यमांसमोर येत नवीन मुद्यांवर ते प्रतिक्रिया द्यायचे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना आजारपणाने ग्रासलं होते. त्यामुळे ते माध्यमांपासून दूर होते. ते आज मुंबईत माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांनी आपल्या आजारपण तुरुंगातलं असल्याचं थेट सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, "माझं आजारपण हे तुरुंगात गेल्यापासून सुरू झालं. मी तुरुंगात होतो, त्यावेळी पासूनच हे आजारपण सुरू झालेलं आहे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे आजारपण तुरुंगा मधलंच आहे." सरकारला चांगले वाटते की, विरोधक हे तुरुंगात असले पाहिजेत. पण आम्ही संपणार नाही. आम्ही लढणारच! देशासाठी लढणार. यासाठी देशातील चांगल्या नेत्यांबरोबर अजूनही संपर्कात आहोत. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. मी लवकरच ठीक होणार आणि मैदानात असेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी राजकारण, विचारसरणी आणि वैचारिक लढा एका बाजूला असते. मित्रत्व एका बाजूला. मी देखील आता नजरकैदेत आहे. वैद्यकीय नजर कैदेत, अशी मिश्किल टिपणी देखील केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तब्येतीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हे कधीकाळी आमच्या जवळचे मित्र होते आणि आम्ही आजही नाती सांभाळतो. आजारपणामध्ये त्यांनी स्वतःहून समोरून फोन केला आणि उपचारासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन केला होता. यावर संजय राऊत म्हणाले, "राजकारण एका बाजूला आणि वैयक्तिक नाती एका बाजूला असतात. केंद्रातील जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी आणि नेत्यांनी दूरध्वनी करून माझी चौकशी केली. उपराष्ट्रपती देखील यांनी फोन केला होता. ही नाते असतात ती टिकवली पाहिजेत. राजकारणामध्ये कितीही शत्रुत्व असलं, तरी ते व्यक्तिगत स्वरूपात येता कामा नये."
'देवेंद्रजींनी माझी चौकशी केली, वैयक्तिक त्यांना कोणी भेटलं, तरी ते माझ्या तब्येतीविषयी चौकशी करत होते. नरेंद्र मोदी यांनीही माझ्या तब्येतीची चौकशी करत होते. आजही सकाळी त्यांनी कोणाकडे तरी माझ्या तब्येतीविषयी चौकशी केल्याचे समजते. उद्धवजी अन् राज ठाकरे हे देखील वारंवार चौकशी करत असतात. पुढील दोन दिवसांमध्ये राज ठाकरे देखील माझ्या घरी येणार आहेत. पण मी बरा आहे,' असे संजय राऊत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.