Ajit Pawar Mumbai meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप मुंबईला रवाना झाले आहे. बीडमधील आजचा हिंदू जनआक्रोश मोर्चा टाळून ते तातडीने मुंबईला रवाना झाले असून, तिथं ते पक्षाच्या बैठकीला हजेरी लावणार आहे.
यानंतर अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार जगपात यांची एकत्रित स्वतंत्र बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होता, याकडे आता लक्ष लागलं आहे.
संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर प्रखर हिंदुत्वावादी भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी इथल्या अधिवेशनात पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या विचारसरणीवर भाष्य केले होते. सर्वसमावेशक अशी पक्षाची भूमिका मांडताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज-फुले-शाहू-आंबेडकर, याच्या विचारांवर काम करेल, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
परंतु या शिबिरस्थळीच शिर्डीतील साईमंदिरातील मुस्लिमांच्या (Muslim) एका धर्मास्थळाविषीय संग्राम जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जगताप यांची आक्रमक हिंदुत्वावर भूमिका घेतली. ही भूमिका अधिक तीव्र झाल्याने, अजित पवार यांनी मध्यंतरी दखल घेऊन समज दिली होती. परंतु ऐकून न ऐकल्यासारखं करत संग्राम जगताप पुन्हा, आक्रमक झाले आणि वाद ओढावून घेतला.
'दिवाळीत खरेदी ही आपल्याच व्यावसायिकांकडून करा. आपल्याच व्यावसायिकांना नफा मिळाला पाहिजे,' अशी भूमिका करमाळा इथं मांडून वाद ओढावून घेतला. यानंतर अजितदादांनी आमदार जगताप यांच्या वागणुकीची गंभीर दखल घेत, थेट पक्षामार्फत नोटीस बजावण्याचं जाहीर केलं. या नोटिशीनंतर देखील संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमधील शिवशक्ती आणि भीमशक्ती, असा एकत्रित जनआक्रोश मोर्चा काढला. त्यात त्यांनी 'डेमोग्रफिक जिहाद'वर भाष्य करत टार्गेट केलं.
यानंतर आमदार जगताप यांनी काल संगमनेर इथं हजेरी लावत, हिंदू सकल मोर्चातून पुन्हा 'हिरव्या सापांचा फणा' ठेवण्याची भाषा केली. तिथं माध्यमांनी पक्षाच्या नोटिशीवर प्रश्न विचारला, तेव्हाही आमदार जगताप यांनी काढता पाय घेतला. अहिल्यानगर शहरात देखील या प्रश्नावर अजितदादांशी सविस्तर बोलणार असल्याचे म्हटले होते. आता आजचा बीडचा मोर्चा टाळून, आमदार जगताप मुंबईला तातडीने रवाना झाले आहेत. त्यामुळे आमदार जगताप यांचा मुंबई दौरा चर्चेत आला आहे.
बीडमध्ये आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चा होणार होता. हा मोर्चा आणि त्यातील सभा रद्द करून, आमदार जगताप मुंबईकडे रवाना झाले आहेत. आमदार जगताप मुंबईत अजितदादांची भेट घेणार आहेत. तिथं पक्षाकडून नोटिशीवर सविस्तर बाजू मांडणार असल्याचे सांगितले जाते. मुंबई वरळी इथं पक्षाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार संग्राम जगताप यांची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे नगरकरांचे लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.