
Ahilyanagar political news : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गटांचा आणि पंचायत समितीच्या 150 गणांच्या आरक्षणाची सोडती सोमवारी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या, तर तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती गणाच्या सोडती तालुका पातळीवर काढण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या 75 गटांपैकी 38 ठिकाणी महिलांचे आरक्षण राहणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये 75 पैकी सर्वसाधारण 39, ओबीसी 20, अनुसूचित जाती 09 आणि अनुसूचित जमाती (महिलांसह) 07 गट आरक्षित झाले.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद (Zilla Parishad) गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली. महसूल उपजिल्हाधिकारी शारदा जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे, महसूल सहायक नीता कदम आणि वैशाली कळमकर सहभागी झाल्या होत्या.
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगरमध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या असल्याने जिल्ह्यात हा गट पहिल्या नंबरला आरक्षित (Reservation) केला. त्यानंतर नागरदेवळे (ता. नगर), उंदिरगाव (श्रीरामपूर), वाकडी (राहाता), पुणतांबा (राहाता), साकुरी (राहाता), दरेवाडी (नगर), बेलापूर बुद्रुक (श्रीरामपूर) आणि भातकुडगाव (शेवगाव) हे नऊ गट अनुसूचित जातीसाठी, तर सातेवाडी (अकोले), राजूर (अकोले), समशेरपूर (अकोले), बोटा (संगमनेर), बारागाव नांदूर (राहुरी), देवठाण (अकोले) हे सात गट अनुसूचित जमातीसाठी गट आरक्षण काढण्यापूर्वीच लोकसंख्येवर आरक्षित केले.
बोल्हेगाव (ता. नगर) इथला शहाबाज पटेल या बालकाच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्याने डाव्या हाताने आरक्षण चिठ्ठ्या काढण्यास सुरूवात केली. सुरूवातीला जिल्ह्यातील लोकसंख्येनेनुसार अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव गटांची घोषणा करून हे गट बाजूला ठेवून उर्वरित गटातून ओबीसीचे 20 (महिला आरक्षणासह) आणि त्यानंतर 39 सर्वसाधारण (महिला आरक्षणासह) सोडती काढण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या 75 गटांपैकी 38 ठिकाणी महिला सदस्यांना आरक्षणानुसार उमेदवारी करता येणार आहे. उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गातून कोणत्याही प्रवर्गातील महिला उमेदवारांना संधी राहणार असल्याने जिल्हा परिषदेत पुरुष सदस्यांपेक्षा महिला सदस्यांची संख्या जास्त राहणार आहे.
अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. हा प्रवर्ग जिल्ह्यातील बोटा (संगमनेर), बारागाव नांदूर (राहुरी), देवठाण आणि सातेवाडी (अकोला) या गटासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे या ठिकाणी निवडून येणाऱ्या अनुसूचित जमातीच्या महिला या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत राहणार आहे, तसेच ज्या महिलांकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असेल, त्या महिला खुल्या गटातून निवडून येऊन अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये राहू शकतात.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने इच्छुक उमेदवार आता मतदारसंघातील धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे, दशक्रिया विधीसारख्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमांना हजेरी लावतील. दिवाळीच्या सुटीनिमित्त धार्मिक ठिकाणी सहलींचेही आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नगर पंचायतीचे माजी सभापती संदेश कार्ले यांनी जिल्हा परिषद गटांचे आरक्षण हे नियमानुसार चक्रीय पध्दतीने होणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकारने हे जाणीवपूर्वक रद्द करत, नव्या पध्दतीने लोकसंख्येवर आधारित आरक्षण काढले. या प्रकारामुळे अनेक ठिकाणी गट आरक्षित झाले आहेत. यामुळे अनेक सदस्यांवर अन्याय झाला आहे. सरकारचे धोरण हे दुटप्पीपणाचे आहे. या धोरणाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
अकोले : समशेरपूर- अनुसूचित जमाती, देवठाण- अनुसूचित जमाती (महिला), धामणगाव आवारी - सर्वसाधारण (महिला), राजूर - अनुसूचित जमाती, सातेवाडी - अनुसूचित जमाती (महिला), कोतूळ - अनुसूचित जमाती
संगमनेर : समनापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), तळेगाव- सर्वसाधारण (महिला), आश्वी बुद्रुक - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), जोर्वे - नागरिकांचा मागास प्रवर्ग, घुलेवाडी - सर्वसाधारण, धांदरफळ बुद्रुक - सर्वसाधारण, चंदनापुरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, बोटा - अनुसूचित जमाती (महिला), साकूर - सर्वसाधारण
कोपरगाव : सुरेगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब्राह्मणगाव - सर्वसाधारण, संवत्सर - सर्वसाधारण, शिंगणापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पोहेगाव बुद्रुक - सर्वसाधारण (महिला)
राहाता : पुणतांबा - अनुसूचित जाती, वाकडी - अनुसूचित जाती, साकुरी - अनुसूचित जाती (महिला), लोणी खुर्द - नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हार बुद्रुक - सर्वसाधारण (महिला)
श्रीरामपूर : उंदीरगाव - अनुसूचित जाती (महिला), टाकळीभान - सर्वसाधारण (महिला), दत्तनगर - अनुसूचित जाती, बेलापूर- अनुसूचित जाती (महिला)
नेवासा : बेलपिंपळगाव - सर्वसाधारण (महिला), कुकाणा - सर्वसाधारण (महिला), भेंडा बुद्रुक - सर्वसाधारण, भानस हिवरे - सर्वसाधारण, खरवंडी - सर्वसाधारण (महिला), सोनई - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), चांदा - सर्वसाधारण (महिला)
शेवगाव : दहिगाव ने - सर्वसाधारण, बोधेगाव - सर्वसाधारण, भातकुडगाव - अनुसूचित जाती (महिला), लाडजळगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
पाथर्डी : कासार पिंपळगाव- सर्वसाधारण, भालगाव - सर्वसाधारण, तिसगाव - सर्वसाधारण, मिरी - सर्वसाधारण (महिला), टाकळीमानूर - सर्वसाधारण (महिला)
अहिल्यानगर : नवनागपूर - सर्वसाधारण (महिला), जेऊर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), नागरदेवळे - अनुसूचित जाती (महिला), दरेवाडी - अनुसूचित जाती, निंबळक - नागरिकांचा मागास प्रवर्ग, वाळकी - नागरिकांचा मागास प्रवर्ग
राहुरी : टाकळी मियाँ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब्राह्मणी - सर्वसाधारण,गुहा - सर्वसाधारण, बारागाव नांदूर - अनुसूचित जमाती (महिला), वांबोरी - सर्वसाधारण (महिला), टाकळी ढोकेश्वर - सर्वसाधारण (महिला), ढवळपुरी- सर्वसाधारण (महिला), जवळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग, निघोज - नागरिकांचा मागास प्रवर्ग, सुपा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
श्रीगोंदा : येळपणे - सर्वसाधारण, कोळगाव- सर्वसाधारण, मांडवगण- सर्वसाधारण (महिला), आढळगाव - सर्वसाधारण (महिला), बेलवंडी- सर्वसाधारण, काष्टी - नागरिकांचा मागास प्रवर्ग
कर्जत : मिरजगाव- सर्वसाधारण, चापडगाव - सर्वसाधारण (महिला), कुळधरण - नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोरेगाव- सर्वसाधारण (महिला), राशीन- नागरिकांचा मागास प्रवर्ग
जामखेड : साकत - सर्वसाधारण, खर्डा - सर्वसाधारण, जवळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.