Shaneshwar Devasthan Trust controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shaneshwar Devasthan Trust controversy : 'शनैश्वर विश्वस्तांचा बंदोबस्त करणार'; गैरहिंदूंना शनिदरबारी ठेवणाऱ्यांना अजितदादांच्या भैय्यांचा इशारा

NCP Mla Sangram Jagtap Criticizes Shanishingnapur Temple Trust at Ahilyanagar Dharmarakshan Sabha : नेवासा इथल्या शनिशिंगणापूर इथं सकल हिंदू समाजाच्यातर्फे शनिशिंगणापूरमध्ये धर्मरक्षण सभा घेण्यात आली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Shanishingnapur Sabha : "नेवाशातील शनिशिंगणापूर इथल्या देवस्थान हिंदूंचे म्हणून जिवंत राहावे, याकरिता प्रत्येकाने यापुढे सजग व जागृत राहावे.

गैरहिंदू असलेल्या 114 जणांना शनिदरबारात पायघड्या घालणाऱ्या विश्वस्त मंडळाचा बंदोबस्त करण्यासाठी यापुढे लढा असणार आहे. देव, देश आणि धर्म याकरिता कुठलाही समझोता करू नका", असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये असलेल्या 114 गैरहिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, याकरिता सकल हिंदू (Hindu) समाजातर्फे आयोजित धर्मरक्षण मोर्चा व त्यानंतर झालेल्या धर्मसभेत ते बोलत होते. सागर बेग, तुषार भोसले, आमदार विठ्ठल लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ऋषिकेश शेटे उपस्थित होते.

हिंदू सकल समाजातर्फे आठ दिवसांपूर्वी मोर्चाची हाक देण्यात आलेली असताना शनैश्वर विश्वस्त मंडळाने आरोप असलेले 114 व अन्य 53 कर्मचारी सतत गैरहजर व हलगर्जीपणा करीत असल्याबद्दल निलंबित करण्याचा निर्णय घेतला. संबंधित कर्मचारी (Workers) काढल्याचे नावासह पत्र दिले नसल्याने पूर्वनियोजित आंदोलन करण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले.

पोलिस बंदोबस्त अन् वाहतूक कोंडी

पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक, आठ फौजदार, 80 पोलिस कर्मचारी व एक आरसीपीचे पथक बंदोबस्तकामी तैनात होते. मोर्चा तसेच रस्त्यावर सभा असल्याने जिल्हा परिषद शाळेपासून एकेरी वाहतूक करण्यात आली होती. भक्तांची गर्दी व सभेच्या अगोदर जोरदार पाऊस झाल्याने सोनई व घोडेगाव रस्त्यावर एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली होती.

भाजप आध्यात्मिक आघाडीचा इशारा

भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी विश्वस्त मंडळ आपल्या जबाबदारीचे योग्य पालन करीत नसल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. चोरी होत नसलेल्या गावात कुठलेही पाप खपवून घेणार नाही. विश्वस्तांचा विश्वासघात चव्हाट्यावर आणला जाईल, असा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT