
Ahilyanagar crime news : अहिल्यानगरमधील 17 वर्षीय कबड्डीपटूवर अत्याचारप्रकरणी पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं आहे.
अंकुश बबन भेंडेकर (वय 24), शिवाजी निवृत्ती वाबळे (वय 55, दोघेही रा. दहिगाव-ने, ता. शेवगाव), रमेश शिवाजी गांगर्डे (वय 26, रा. बहिरोबाचीवाडी, ता. कर्जत), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अहिल्यानगरमधील क्रीडा क्षेत्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेतील आरोपी शिवाजी वाबळे अन् रमेश गांगर्डे क्रीडा प्रशिक्षक असून, दोघांचीही न्यायालयीन (Court) कोठडीत रवानगी केली आहे. अंकुश भेंडेकर याला जामीन मिळालेला आहे. पीडित 17 वर्षीय युवतीच्या मामाने याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित 17 वर्षीय युवती राष्ट्रीय कबड्डीपटू आहे. चांगले प्रशिक्षण मिळावे, यासाठी तिने भोसरी येथील संस्थेत सराव सुरू केला. त्यासाठी वाकड इथं मामाकडे राहत होती. 25 फेब्रुवारीला ती घरी न परतल्याने तिच्या मामाने पोलिस (Police) ठाण्यात धाव घेतली. अल्पवयीन असल्याने तिचे अपहरण झाल्याप्रकरणी 26 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी अंकुश भेंडेकर याला सुरुवातीला अटक केली. त्याला जामीन मिळाला आहे.
आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. त्यानुसार वाकड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी आणि बाल लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवले. प्रकरणाचे गांभीर्यामुळे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्याकडे तपास आला. सुनील कुराडे यांनी पुढे तपासात संशयित म्हणून शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे यांना अटक केली.
पीडित युवतीला संशयित क्रीडा प्रशिक्षकाने कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून तिला नेवासे इथं नेलं. तेथून पुढे नेऊन हॉटेलमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतर शिवाजी वाबळेने तिला भोपाळला इथं नेले. तिथेही अत्याचार झाला. पुढे श्रीलंकेतील उर्वरित स्पर्धेसाठी खासगी अॅकॅडमीत जावे लागेल, असे सांगितले. हा प्रकार 28 ते 31 जानेवारी या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले.
अंकुश भेंडेकरने 25 फेब्रुवारीला तिला पुण्यातून पैठण, त्यानंतर राहुरी इथं नेले. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. वाकड पोलिसांनी या प्रकरणी नेवाशातून अंकुशला अटक केली. पीडित मुलगी सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर अत्याचार झाल्याबाबत तिने सांगितले. त्यानुसार तिचा जबाब नोंदवून गुन्ह्यामध्ये कलम वाढ केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.