Dhananjay Jadhav BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhananjay Jadhav BJP : धडाकेबाज उपमहापौर जाधवांच्या अंगावर 'खादी' नसती, तर असती 'खाकी'! सांगितली अधुरी इच्छा...

Outstanding police personnel in Ahilyanagar were honoured with Police Bravery Awards by SP Somnath Gharge and BJP Deputy Mayor Dhananjay Jadhav : अहिल्यानगर पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते पोलिस शौर्य सन्मान करण्यात आला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Police Awards : अहिल्यानगर पोलिस दलातील विविध विभागात दमदार कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलिस शौर्य सन्मान देत गौरव करण्यात आला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि भाजपचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते हा सन्मान झाला.

या वेळी धनंजय जाधव यांनी, 'अंगावर राजकीय खादी नसती, तर खाकी असती', ही अपुरी राहिलेली इच्छा पोलिस अधीक्षक घार्गे यांच्यासमोर भर कार्यक्रमात बोलून दाखवली. पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना, प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हा शौर्य दाखवत असतो, असं उपमहापौर जाधव यांनी निरीक्षण नोंदवलं.

उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले, "राजकारणात सक्रिय असताना, अंगावर खादी आली. पण राजकारणात नसतो, तर पोलिस (Police) दलाची खाकी अंगावर असती. लहानपणी आपल्याला पोलिस-पोलिस खेळायला खूप आवडायचे. पोलिस गणवेशातील लहानपणीचे फोटो देखील आजही आपल्याकडे आहे."

भाजपचे (BJP) युवा नेते उपमहापौर सध्या अहिल्यानगर शहराच्या राजकारणात दमदार कामगिरी करत आहेत. भाजपकडून उपमहापौरपदावर संधी मिळाल्यानंतर पहिल्या 50 दिवसांत केलेल्या कामाचा अहवाल त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सादर केला. आगामी काळात अहिल्यानगर शहराला पूर्णवेळ पाणीपुरवठा व्हावा, असं त्यांचं स्वप्न आहे. त्यानुसार त्यांचं नियोजन सुरू आहे.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी, पोलिस दलातील एकाच शाखेची कामगिरी दिसते. ती म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेची! पण पोलिस दल ही समाजात शांतता-सु्व्यवस्था राखण्यासाठीची सामूहिक जबाबदारी आहे. जेवढी स्थानिक गुन्हे शाखा कामगिरी करत असते, तेवढ्याच पोलिस दलातील इतर शाखा देखील समांतर कामगिरी असताता, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

पोलिस शौर्य सन्मान कार्यक्रमात अहिल्यानगर पोलिस दलातील तब्बल 47 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात पुरूषांबरोबर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT