

Rahuri bypoll update : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका स्पष्ट होत नसतानाच, काँग्रेसने दिल्लीतून विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत देताच, त्यावर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यानगरमध्ये येत पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
'आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहोत. जे काही होईल, ते महाविकास आघाडी (MVA) मिळून करू. प्राजक्त तनपुरे काही संपर्कात नाही. आम्ही आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीने योग्यवेळी निर्णय घेऊ आणि निवडून आणू', असे थोरात यांनी स्पष्ट केलं
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, 'आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहोत. जे काही होईल, ते महाविकास आघाडी मिळून करू. प्राजक्त तनपुरे काही माझ्या संपर्कात नाही. आम्ही आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीने योग्यवेळी निर्णय घेऊ.' सोमवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तोपर्यंत उमेदवार तयार होईल, आमचा उमेदवार राहणार अन् तो निवडून देखील येईल, असेही थोरात यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक कोणी लढत नसेल, तर काँग्रेसने बारामती आणि राहुरीमध्ये निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांना दिल्लीतील वरिष्ठांकडून हिरवा कंदिल देखील दिला आहे. यातच थोरातांनी प्रतिक्रिया देत उमेदवार तयार असल्याचे सांगत, महाविकास आघाडी बरोबर राहील, असे म्हणत, राजकीय वादळ उभं करून दिलं आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. परंतु त्यांचे पूर्वीचे उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तनपुरे यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून चर्चा सुरू असल्याचे सांगितलं जात आहे. पण निर्णय अजून काही बाहेर आलेला नाही.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी. पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे. त्यांचा निर्णयावर बरीच गणितं अवलंबून राहतील. भाजपला फायदा होईल, असं कोणतीही भूमिका कार्यकर्त्यांनी घेऊ नये, असे स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडीकडून, या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा अधिकार आहे. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ताकद असल्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांना बसून निर्णय घ्यावा लागेल, असेही खासदार राऊत यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.