Hindu Muslim tension Ahilyanagar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hindu Muslim tension Ahilyanagar : संग्राम जगतापांच्या उपस्थित पुतळा जाळला; काही तासांत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, मुस्लिम युवकांची प्रतिउत्तराची ठिणगी!

Tipu Sultan Statue Row in Ahilyanagar; Milk Abhishek After Burning : अहिल्यानगर मधील मुस्लिम युवकांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला.

Pradeep Pendhare

Tipu Sultan statue controversy : मालेगाव महापालिकेतील उपमहापौर यांच्या दलनातील टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचा वादाला, पुढे राजकीय रंग लागला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांना फटकारल्यानंतर हा वाद राज्यात शिगेला पोहोचला. टिपू सुलतान यांच्यावरून अजूनही ठिणग्या उडत आहे.

अहिल्यानगर शहरात अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थित टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळल्यानंतर, काही वेळातच मुस्लिम युवकांनी एकत्र येत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत, प्रत्युत्तर दिलं. यावरून आगामी काळात अहिल्यानगर शहरात हिंदू-मुस्लिम वाद पेटवून आणखी राजकीय भडका उडणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

अहिल्यानगर शहरात टिपू सुलताना आणि काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले. हे आंदोलन सकल हिंदू समाजाने केलं. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. जगताप यांनी सपकाळ यांच्यावर या वेळी जोरदार टीका केली.

मालेगाव (Malegaon) महापालिका कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानची प्रतिमा लागणार नाही, याची खबरदारी सकल हिंदू समाज घेईल. सरकारी कार्यालयात अशा धर्मांध व्यक्तीचे छायाचित्र लागता काम नये, त्यांनी देशाला राज्याला दिशा दिली असेल, अशाच राष्ट्रपुरूषांचे छायाचित्र सरकारी कार्यालयांमध्ये असणे आवश्यक आहे, असे आमदार जगताप यांनी म्हटले.

या आंदोलनाच्या काही वेळातच, रात्री मुस्लिम समाजाच्या युवकांनी एकत्र येत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. टिपू सुलतान यांच्या पुतळा दहनाचा निषेध करण्यात आला. देशाचे पहिला मिसाईल मॅन म्हणून अन् हिंदुस्थान म्हणून, टिपू सुलतान यांचा आम्हाला अभिमान आहे, असे दुग्धाभिषेक घालताना मुस्लिम युवकांनी म्हटलं.

संविधानाचा अपमान

काही नापाक हातांशी टिपू सुलतान यांच्या पुतळ्याचं दहन झालं. टिपू सुलतान या देशासाठी लढले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना शहीद झाले. संविधानात त्यांचा फोटो असून, त्यांचा पुतळा जाळून संविधानाचा अपमान केला गेला आहे. यामुळे पुतळा दहन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम युवकांनी कोतवाली पोलिसांकडे निवेदन देत केली आहे.

स्वातंत्र्य लढ्यात योगदान

ब्रिटिशांविरोधात लढताना, टिपू सुलतान यांचे योगदान मोठे आहे. या लढाईतच ते शहीद झाले. त्यांना पहिले मिसाईल मॅन म्हटले जाते. त्यांचे तंत्रज्ञान ब्रिटिश सरकार आज देखील वापरतात. ब्रिटिश आजही टिपू सुलतान यांना हिंदुस्थानी म्हणून संबोधतात, याची आठवण करून देताना, ब्रिटिश त्यावेळी म्हटले होते की, टिपू सुलतान नसते, तर तीन महिन्यात हिंदुस्थान फत्ते केलं असतं. यावरून शहीद टिपू सुलतान यांचे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात किती योगदान होते, हे समजते, असेही मुस्लिम युवकांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT