Bus Stand Assault Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bus Stand Assault Case : 'मी पोलिस आहे', म्हणत बस चालक-कंडक्टरला बेदम मारहाण; उपनिरीक्षकालाही ॲट्रॉसिटी अडकवण्याची धमकी देत दादागिरी

Police complaint filed against a constable from Yeola police station in Nashik allegedly beating up a bus driver and conductor at Rahata bus stand : राहाता इथल्या बसस्थानकावर चालक आणि वाहकाला पोलिस कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar news : अहिल्यानगरमधील राहाता इथल्या बसस्थानकात एसटी चालक अन् कंडक्टरला पोलिसाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसासह त्याच्याबरोबर असलेल्या तीन ते चार जणांनी ही मारहाण केली असून, त्याचा मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

मारहाण करणारा पोलिस कर्मचारी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला पोलिस ठाण्याचा असून, त्याच्याविरोधात कारवाई करणारे स्थानिक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक, पोलिस कर्मचाऱ्यांना देखील ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

बसस्थानकात किरकोळ कारणातून वादाला सुरवात होत, थेट बसचा चालक आणि कंडक्टरला मारहाणीपर्यंत प्रकार गेला. या प्रकरणी बस कंडक्टर बालाजी बोरगावकर आणि चालक विकास मुंढे यांनी फिर्यादी दिली आहे. येवला ठाण्याचा पोलिस (Police) कर्मचारी फकीरा थोरात, संजय बनसोडे व त्याच्याबरोबर असलेल्या आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी फकीरा थोरात याने किरकोळ कारणातून मारहाणीला सुरूवात केली. त्याच्याबरोबर असलेल्या इतर तिघा-चौघांनी देखील जबर मारहाण केली. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात मुका मार लागला असून, कंडक्टरच्या अंगावर कपडे देखील मारहाण करणाऱ्यांनी फाडले. यामुळे बसस्थानकावर एकच गोंधळ उडाला असून, बस वेळेत न सुटून प्रवाशांचे मोठे नुकसान झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच फकीरा थोरात यांनी, स्थानिक पोलिसांना देखील दमबाजी केली. मी पोलिस आहे, तुमच्यावर तसेच उपनिरीक्षक लेंडे आणि ठाणे अंमलदार बर्डेंना, तुम्हा सर्वांना कामाला लावून टाकेल, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहाता पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दिली आहे. फकीरा तोताराम थोरात व त्याच्याबरोबर असलेल्या तिघांविरोधात 132, 121 (1), 351(2),352,(3) (5) कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहाता ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुमावत तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT