

Devendra Fadnavis MNREGA announcement : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मनरेगाच्या चौथ्या हप्त्याच्या स्वरूपात महाराष्ट्राला 1168 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती देताना, केंद्र सरकारच्या या हप्त्यामुळे ग्रामीण रोजगाराला मोठा चालना मिळेल, असे म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या एक्स खात्यावर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हप्त्याची माहिती देताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "श्रमिकांच्या हिताचा विचार करीत ग्रामीण रोजगारासाठी मनरेगाच्या माध्यमातून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी चौथा हप्ता म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 1168 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे."
या हप्त्यामुळे महाराष्ट्राला (Maharashtra) मोठा लाभ होणार असून, आमच्या आदिवासी, अनुसूचित जाती आणि इतरही श्रमिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. ग्रामीण कुटुंबांना सणासुदीच्या काळात मोठा आधार यामुळे मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महात्मा गांधी रोजगार हमी योजनांतर्गत अकुशल कामगारांची मजुरी गेल्या काही महिन्यांपासून थकीत होती. सुमारे 67 कोटी रुपयांचा निधी प्राप्त न झाल्याने अकशुल कामगार आर्थिक कोंडीत सापडला होता. होळीचा सण असल्याने त्याकरिता निधीची उपलब्धता व्हावी अशी मागणी होत होती. हा देखील देखील सरकारने मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भाने माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह विविध संघटनांनी या विषयावर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत मनरेगा आयुक्तालयाकडून सरकार स्तरावर निधीची मागणी करत पाठपुरावा केला. यानंतर हा निधी मंजूर झाल्याचे सूत्रांकडून समजले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.