Ahilyanagar Teacher Elections 2025 : माध्यमिक शिक्षक सोसायटीत गेल्या 25 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या पुरोगामी मंडळाचा परिवर्तन मंडळाने सुपडासाफ करत, सर्व 21 जागांवर विजय मिळवला.
विरोधकांनी या निवडणुकीत दाखवलेली एकजूट विजयाचा मार्ग सोपा करणारी ठरली.
जिल्हा माध्यमिक शिक्षक (Teacher) सोसायटीच्या 21 संचालक मंडळाच्या निवडीसाठी रविवारी मतदान झाले. जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली आज मतमोजणीची प्रकिया पार पडली. शिक्षक सोसायटीत जेष्ठ नेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार मंडळाची 25 वर्षांपासून एकहाती सत्ता होती.
यंदाच्या निवडणुकीत (Elections) विविध शिक्षक संघटनांनी एकीची वज्रमुठ दाखवत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी स्वाभिमानी परिवर्तन मंडळ रिंगणात उतरवले. यात सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव करीत परिवर्तन मंडळाने सर्वच्या सर्व जागा जिंकत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला . सोसायटीत सत्ताधारी मंडळाने पारदर्शी कारभाराचा दावा करीत मतदारांना पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन केले होते. मात्र मतदारांनी यंदा परिवर्तन घडवत विरोधकांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले.
शिक्षक नेते राजेंद्र लांडे, प्राचार्य सुनील पंडित आणि परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष दत्ता नारळे यांनी सर्व शिक्षक संघटनांना एकत्र करीत सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान उभे केले. सर्व संघटनाची एक वज्रमुठ तयार करण्यात विरोधक यशस्वी झाले. विरोधकांच्या एकीमुळे तिसरी आघाडीचा प्रयत्न अयशस्वी झाला. सत्ताधाऱ्यांसमोर विरोधकांनी कडवे आव्हान उभे केल्याने परिवर्तन मंडळाचा विजयाचा मार्ग सुकर बनला.
त्यात सत्ताधारी मंडळाकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी विद्यमान संचालकांना पुन्हा संधी न देता नवीन उमेदवार रिंगणात उतरवले. यामुळे जुन्या निष्ठावान संचालकांमध्ये नाराजी वाढली आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांची साथ सोडत विरोधी परिवर्तन मंडळाच्या प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली.
स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे नेते राजेंद्र लांडे यांनी सभासदांनी निवडणूक हातात घेतली होती. आमच्याच फुट पाडण्याचा प्रयत्न ही झाला. सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला सभासद कंटाळले होते. आम्ही शिक्षकांसाठी संघर्ष करणारे उमेदवार रिंगणात उतरवले. सर्व विरोधक व शिक्षक संघटना एकत्र आले आणि तिसऱ्या आघाडीचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला . त्यांचे सात संचालक आमच्या सोबत आले. यामुळे सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला .विरोधकांची एकजुट यशस्वी ठरली, अशी प्रतिक्रिया दिली.
सर्वसाधारण : बाजीराव अनभुले, राजेंद्र कोतकर, अतुल कोताडे, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, बाळाजी गायकवाड,उमेश गुंजाळ, आप्पासाहेब जगताप, सुनील दानवे, किशोर धुमाळ, विजय पठारे, छबु फुंदे, साहेबराव रक्टे, शिवाजी लवांडे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, महिला राखीव : वर्षा खिलारी, वैशाली दारकुंडे, अनुसुचित जाती : सुरज घाटविसावे, इतर मागासवर्ग : अर्जुन वाळके, भटक्या-विमुक्त : बाबासाहेब बोडखे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.