Shani Shingnapur Devasthan scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shaneshwar Devasthan Trust scam : 'शनैश्वर'च्या घोटाळ्याविषयी मंत्रालयाच्या अहवालात काय? विश्वस्तांना म्हणणे मांडण्याची 'डेटलाईन' निश्चित

500 Crore Scam Probe Ahilyanagar Shaneshwar Trust Gets One Week Deadline : शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे शुक्रवारी 25 तारखेला सुनावणी होणार आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar trust scam investigation : अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर इथल्या 500 कोटी रुपयांसह विविध घोटाळ्यासंदर्भात राज्य धर्मादाय आयुक्तांनी काढलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील विश्वस्तांच्यावतीनं तीन वकील मुंबई कार्यालयात उपस्थित राहिले.

वकिलांनी अर्जाद्वारे प्रमाणित नकलांची केलेली मागणी मान्य करून विश्वस्त मंडळास म्हणणे, मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत धर्मादाय आयुक्तांनी दिली आहे. विश्वस्तांना म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवार (ता.25) ही तारीख देण्यात आली आहे.

आमदार विठ्ठल लंघे व आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील कर्मचारी भरतीत झालेला भ्रष्टाचार व कोट्यवधीच्या ऑनलाईन शनिदर्शन अ‍ॅप घोटाळ्यावर लक्षवेधी उपस्थित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याची गंभीर दखल घेत, तसंच विधी व न्याय मंडळामार्फत आलेल्या चौकशी अहवालाचा दाखला देत, कारवाईचे संकेत दिले. याशिवाय धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून 2018 साली करण्यात आलेला कायदा व घटना अंमलात आणून नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करण्याच्या अगोदर विश्वस्तांवर फौजदारी दाखल करण्याचे संकेत दिले होते.

मुंबईतील (Mumbai) धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधीक्षक सीमा केणी यांच्या सहीने सर्व विश्वस्तांना प्रत्यक्ष नोटीस बजावण्यात आली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व विश्वस्तांनी मुंबई इथल्या अ‍ॅड. समीर जाधव व देवस्थानचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. लक्ष्मण घावटे आणि अ‍ॅड. सतीश पालवे यांना म्हणणे मांडण्यास पाठविले होते.

धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्यापुढे झालेल्या सुनावणीला तीनही वकील हजर झाले. वकालतनामा दिल्यानंतर मंत्रालयातून आलेल्या अहवालाची झेरॉक्स देण्यात आली. अ‍ॅड. जाधव यांनी एका अर्जाद्वारे प्रमाणित नकलांची मागणी केली असता, ही मागणी मान्य करून शुक्रवार (ता.25) ही तारीख म्हणणे मांडण्यासाठी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विश्वस्त कायदा 1950 कलमानुसार 41(डी) नुसार विश्वस्तांना नोटीस बजावण्यात आली असल्याने विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करून कर्मचारी भरतीत अनियमितता व त्यातून झालेला भ्रष्टाचार समोर येऊन फौजदारी दाखल होण्याची टांगती तलवार विश्वस्तांवर आहे. शुक्रवार (ता.11) रोजी लक्षवेधी झाल्यानंतर शनिवारी सायबर शाखेने फिर्याद दिली आणि तीनच दिवसाने धर्मादाय आयुक्तांनी नोटीस बजावल्याने विश्वस्त व अधिकारी चांगलेच कोंडीत सापडले आहेत.

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. लक्ष्मण घावटे यांनी देवस्थानच्या विश्वस्तांच्यावतीने अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मंजूर झाला. प्रमाणित नकलाचा संच बुधवारी (ता.23) मिळाल्यानंतर दोन दिवसांत विश्वस्तांच्यावतीने धर्मादाय आयुक्तांना म्हणणे मांडण्यात येईल, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT