Shanaishwar Devasthan Trust 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shanaishwar Devasthan Trust : शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; पोलिस बंदोबस्तात कलेक्टरांकडून 'देऊळ कार्यालय बंद'

Ahilyanagar Shani Shingnapur Devasthan Trust Dismissed District Collector Pankaj Ashiya Takes Charge : अहिल्यानगर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयाला भेट देत पाहणी केली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Newasa news : कर्मचारी भरतीमधील अनियमितता, कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन अ‍ॅप घोटाळा अन् आर्थिक घोटाळ्याचे मुद्दे चर्चेतील अन् देशभरातील प्रसिद्ध अहिल्यानगरमधील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारने बरखास्त केल्यानंतर आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी देवस्थान ट्रस्ट कार्यालयाला भेट देत पदभार स्वीकारला.

यानंतर लगेचच, जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थान ट्रस्टचे कार्यालय सील करण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पोलिस बंदोबस्तात हे कार्यालय सील केल्याने खळबळ उडाली. ही कारवाई करताना, स्थानिक आमदार विठ्ठल लंघे आणि तक्रारदार उपस्थित होते.

शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) इथले श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आल्याचा आदेश सोमवारी रात्री उशिरा काढण्यात आला. उपविधी सल्लागार व उपसचिव सागर ज. बेंद्रे यांच्या सहीने हा आदेश निघाला. राज्य सरकारच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर तब्बल पाच दिवसानंतर जिल्हाधिकारी यांनी देवस्थान ट्रस्ट कार्यालयाला भेट दिली.

सरकारने (Government) अधिनियम सन 2018मध्ये केलेल्या अधिनियमातील कलम 5च्या उपकलम (1) अन्वये शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापन आता नव्याने ‘श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती’ अशी तरतूद केली आहे. यामुळे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून तात्पुरती नियुक्ती सरकार केली.

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आज देवस्थान कार्यालयात भेट पाहणी केली. देवस्थानवरील विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर इथं कागदपत्रांची हेराफेरी केली जात असल्याची बाब समोर आली होती. याची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी यांनी देवस्थानमधील कार्यालय सील करण्याचा निर्णय घेतला.

विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून मंदिर देवस्थान ट्रस्टसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांचे पुरावे नष्ट केले जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रमुख कार्यालय सील केल्याची कारवाई केल्याची चर्चा रंगली होती. शनि शिंगणापूर देवस्थान कार्यालय सील करताना कार्यकारी अधिकारी मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चेतला अधिकच तोंड फुटले. जिल्हाधिकारी पुढ कारवाईचे काय पाऊल उचलणार याची चर्चा होती.

भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत राहू

आमदार विठ्ठल लंघे यांनी, अनेक कार्यकर्ते व संघटनेने शनैश्वर देवस्थानमधील भ्रष्टाचार व ऑनलाइन अ‍ॅप घोटाळ्याचा पाठपुरावा केलेला आहे. येथील नोकर भरती, अनियमितता व त्रुटींबाबत आम्ही विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यामुळे यशप्राप्ती झाल्याचे सांगितले.

संगनमताने लूट, फौजदारी कारवाई करणार

भारतीय जनता पक्षाचे ऋषिकेश शेट यांनी राजकीय कामाकरिता घेतलेल्या सर्व सहा हजार रुपये पगारावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने राजीनामे द्यावेत, अन्यथा संगनमताने देवस्थान लुटले म्हणून सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा दिला.

दरंदले पुण्याला, जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण वाघ यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले रुग्णालय तपासणी करिता पुण्यास गेलेले आहेत. दरंदले हजर होण्यास आल्यानंतर मला भेटण्यास सांगा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

ही कार्यालय सील केली

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील स्थापत्य विभाग, कार्यालयीन अधीक्षक, आवक-जावक विभाग, लेखा विभाग, संगणक विभाग, रेकॉर्ड विभाग आणि आस्थापना विभाग असे सात विभाग सील करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT